पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : खरा पंचनामा
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीईटी परीक्षा संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पहिली परीक्षा एप्रिल २०२६ मध्ये आणि दुसरी परीक्षा मे २०२६ मध्ये आयोजित करण्यात येईल. विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी परीक्षा ऐच्छिक असेल. दोन्ही परीक्षा दिल्यास, विद्यार्थ्याच्या जास्त गुणांची परीक्षा प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाईल.
राज्यातील अभियांत्रिकी, विधी, फार्मसी, एमबीए, अशा महत्त्वाच्या अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी सीईटी आता दोन वेळा होणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने चाचपणी सुरू केली होती. दोन पर्यायांच्या व्यवहार्यतेबाबत अहवाल मागवण्यात आला होता. त्यानुसार आता वर्षातून दोन वेळा हि परीक्षा घेण्यात येणार आहे.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ संबधित अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.