Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बारामतीतील 51 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरणविशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट आयोजनहॅन्डबॉल, कबड्डी, खो-खो, हॉलिबॉलच्या अंतिम फेरीत सांगलीची धडक

बारामतीतील 51 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट आयोजन
हॅन्डबॉल, कबड्डी, खो-खो, हॉलिबॉलच्या अंतिम फेरीत सांगलीची धडक

बारामती : खरा पंचनामा

बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मुख्य मैदान, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मैदान शारदानगर आणि वीर सावरकर भवन जलतरण तलाव येथे 51 व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा गुरुवारचा चौथा दिवस उत्साहात आणि चुरशीच्या वातावरणात पार पडला. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान हॅन्डबॉल, कबड्डी, खो-खो, हॉलिबॉलच्या अंतिम फेरीत सांगली पोलीस दलाच्या संघाने धडक मारली आहे.

17 ते 21 नोव्हेंबरदरम्यान होत असलेल्या या क्रीडा स्पर्धांचे यावर्षी आयोजन करण्याचा मान पुणे ग्रामीण पोलीस दलाला मिळाला आहे. गुरुवारी (ता. 20) अनेक सांघिक व वैयक्तिक प्रकारांमध्ये अंतिम सामने रंगले. खेळाडूंनी विजयाची जोरदार लढत देत उत्कृष्ट कामगिरी केली.

क्रॉसकंट्री स्पर्धा महिला गट : सोनाली देसाई (कोल्हापूर) सुवर्ण,
पुरुष गट : हर्षवर्धन दाभाडे (सातारा) सुवर्ण
जलतरण आणि डायव्हिंग पुरुष गट (सुवर्ण विजेते) 50 मी. फ्री स्टाईल : जितेंद्र कुटे (सातारा), 50 मी. बॅक स्ट्रोक : सचिन खैरमोडे (सातारा), 50 मी. बटरफ्लाय : समाधान वर्गे (सातारा), 50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक : खंडू माळी (सोलापूर ग्रामीण), 100 मी. फ्री स्टाईल : जितेंद्र कुटे (सातारा), 100 मी. बॅक स्ट्रोक : सचिन खैरमोडे (सातारा), 100 मी. बटरफ्लाय : समाधान वर्गे (सातारा), 100 मी. ब्रेस्ट स्टोक : खंडू माळी (सोलापूर ग्रामीण), 200 मी. वैयक्तिक मेडले : रोहित खाडे (कोल्हापूर), 400 मी. फ्री स्टाईल : जितेंद्र कुटे (सातारा), 1500 मी. फ्री स्टाईल : सुनिल सुतार (कोल्हापूर), 1 मी. स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग : सौरभ जासूद (सांगली), 3 मी. स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग : रामचंद्र गायकवाड (सांगली), 10 मी. प्लॅटफॉर्म डायव्हिंग : रामचंद्र गायकवाड (सांगली), 4*10 मी. फ्री रिले : कोल्हापूर संघ, 4*100 मी. मेडले रिले: सातारा संघ

कुस्ती स्पर्धा, सुवर्णपदक विजेते, पुरुष गट

57 कि.ग्रा. : अनिकेत यादव (सातारा), 61 कि.ग्रा. : अमोल दोन्हे (पुणे ग्रामीण), 65 कि.ग्रा. शिवम भुजबळ (सातारा), 70 कि.ग्रा. : रोहन पोरे (सोलापूर शहर), 74 कि.ग्रा. : अमर क्षीरसागर (सोलापूर ग्रामीण), 79 कि.ग्रा.: सत्यजित तानगुडे (कोल्हापूर), 86 कि.ग्रा, आदित्य इंजेकर (सातारा), 92 कि.ग्रा. : पवन कराड (पुणे ग्रामीण), 97 कि.ग्रा. : विशाल गंभीरे (पुणे ग्रामीण), 125 कि.ग्रा. अभिषेक पाटील (कोल्हापूर)

महिला गट

50 कि.ग्रा. : रेखा नाईकवाडे (सोलापूर ग्रामीण), 53 कि.ग्रा. : सपना यमाजी (सोलापूर शहर), 55 कि.ग्रा. : लता पाडवी (सातारा), 57 कि.ग्रा.: स्वाती जाधव (सातारा), 59 कि.ग्रा. जयश्री लाड (सातारा), 62 कि.ग्रा. आरती फाळके (सातारा), 65 कि.ग्रा. : वनिता कोळपे (सातारा), 68 कि.ग्रा. : मयुरी कुंभार (सातारा), 72 कि.ग्रा. अश्विनी जाधव (सातारा), 76 कि.ग्रा. : धनश्री मांडवे (सातारा)

सांघिक स्पर्धांतील निकाल

हॅण्डबॉल उपांत्य फेरी विजेते : कोल्हापूर व सांगली, हॉकी अंतिम सामन्यासाठी पात्र : पुणे ग्रामीण व कोल्हापूर, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी येथील सामने उशिरापर्यंत रंगले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.