मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीची सहा तास कसून चौकशी
पुणे : खरा पंचनामा
मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची आज सहा तास कसून चौकशी करण्यात आली. सोमवारी तिचा बाब नोंदविण्यात आला होता.
तेजवाणीने महार वतन मिळालेल्या व्यक्तींकडून पॉवर ऑफ अॅटर्नीकरून घेतलेले कागदपत्रे तसेच 'अमेडिया एंटरप्राइझेस' कंपनीसोबत केलेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने ही चौकशी झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
चौकशीच्या अनुषंगाने काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या 'अमेडिया कंपनीवर' मुंढवा येथील जमीन प्रकरणात खडक पोलिस ठाण्यात एक गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
मुंढवा येथील जमीन महार वतनाची आहे. परंतु, २००६ मध्ये तेजवानी हिने २७५ व्यक्तींकडून ही जमीन पॉवर ऑफ अॅटर्नी करून घेतली. त्यानंतर २०२५ मध्ये ही जमीन तेजवाणी हिने अमेडिया कंपनीसोबत करार करून ती जमीन त्यांना दिली.
दरम्यान, पुणे पोलिस आता जमीन प्रकरणात नेमका व्यवहार काय झाला, या अनुषंगाने तपास करत आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले, 'अमेडिया एंटरप्राइझेस' कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी आणि हेमंत गवंडे यांना नोटीस देऊन चौकशीला बोलावले होते. त्यातील हेमंत गवंडे याची चौकशी करण्यात आली आहे. आता बुधवारपासून तेजवाणीची चौकशी सुरू आहे.
तेजवाणी हिच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत अनेक मुद्दे समोर आले आहेत. त्या अनुषंगाने काही कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. शुक्रवारी (ता. २१) देखील या प्रकरणात चौकशीसाठी तेजवाणीला बोलविण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.