गणेश काळे हत्या प्रकरण; चार आरोपींना अटक, पिस्तुल, हत्यारे जप्त
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात गँगवॉरमधुन कोंढवा भागात गणेश काळे या रिक्षाचलकाची हत्या करण्यात आली. त्याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले आणि त्याची हत्या केली गेली. चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अमन मेहमबुब शेख, (22) अरबाज पटेल, आणि दोन अल्पवयीन आरोपींना गजाआड केले आहे. शिवापूर परिसरातून चार आरोपींना कोंढवा डी बी पथकाने अटक केली आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले होते.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तूल आणि दोन हत्यारे जप्त केली आहेत. चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील एक आरोपी हा ज्यावेळी कृष्णा आंदेकरला मेडिकलला आणले होते त्यावेळी त्याला भेटायला गेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत गणेश काळे याच्यावर त्यांनी गणेशवर कोयत्याने वार केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले की, गणेशचा भाऊ समीर काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणात सहभागी होता. त्यानेच हत्येसाठी पिस्तुले मध्य प्रदेशामधून आणली होती. समीरसोबत आकाश म्हस्के, संगम वाघमारे आणि आबा खोंड होते. या चौघांनी धुळेमार्गे मध्यप्रदेशातून पिस्तूले आणल्याची माहिती समोर आली होती.
आयुष कोमकरची आदेंकर टोळीकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर टोळी प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडूआदेकर आणि त्याच्यासहित अनेकांना अटक करण्यात आली होती. मात्र तरीही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचे गणेश काळेच्या हत्येतून दिसून आले आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणी तुरूंगात असणाऱ्या समीर काळेचा गणेश काळे हा भाऊ आहे. त्यामुळे या हत्येमागे टोळीयुद्ध आहे का? याचा तपास पोलिस करत आहेत. गेल्यावर्षी वनराज आंदेकरची हत्या कोमकर टोळीकडून करण्यात आली होती. त्यानंतर त्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आंदेकर टोळीच्या प्रमुखाची अटकेची कारवाई केली. तरीही टोळी सक्रीय असल्यास पोलिसांसमोर आव्हान आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.