कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा
पंढरपूर : खरा पंचनामा
कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक आज विठुरायाची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी दर्शन रांगेतील पहिले मानाचा वारकरी दांपत्य उपमुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेमध्ये सहभागी झाले होते. नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावाचे रामराव वालेगावकर आणि सौ. सुशिलाबाई वालेगावकर हे कार्तिकी एकादशीनिमित्त मानाचे वारकरी ठरले.
मागील 20 वर्षांपासून ते वारी करतायत, मंदिर समितीच्या वतीने शिंदेंच्या हस्ते तुळशीची माळ घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे देखील पत्नी आणि मुलासह या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित होते. तर मंत्री भरत गोगावले, जयकुमार गोरे देखील यावेळी उपस्थित होते. तर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेचे दोन शाळकरी मुलं पुजेत सहभागी झाले होते.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, "आषाढी व कार्तिकी महापूजा सामील झालेले मानाचे वारकरी दाम्पत्यांना एक वर्षाचा नाही तर कायमस्वरूपी एसटीचा मोफत देण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल मंदिर आणि परिसरात एक वेगळी ऊर्जा आहे. चौथ्यांदा महापूजेचा मान मिळाला. खूप भाग्यवान समजतो. इथे फक्त vip वारकरी आहेत. शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री ही सगळी पदे विठ्ठलांमुळे मिळाली. सलग 7 महिने पाऊस पडतो आहे. बळीराजा वरचे सर्व संकटे दूर कर... त्याच्या जीवना सुखाचे आनंदाचे दिवस येऊ दे.. संपूर्ण महाराष्ट्र हाच आमचा परिवार... सर्वांना चांगली सुखासमृद्धीचे दिवस येऊ दे हा आमचा अजेंडा आहे. चंद्रभागा प्रदूषण मुक्त करणार." असं एकनाथ शिंदे म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.