सांगलीत श्रीमती राजमती यशवंत पवार स्मृती बुद्धिबळ महोत्सवास प्रारंभ
सांगली : खरा पंचनामा
तब्बल 3 स्पर्धा एकाच वेळी (U-8, U-12, U-16), तब्बल 245+ बक्षिसे तसेच सहभाग प्रमाणपत्र, सर्वोत्कृष्ट शाळा आणि अकॅडेमीसाठी 10 चषक आणि प्रमाणपत्र असे स्वरूप असणाऱ्या सांगलीतील बुद्धिबळ महोत्सवास प्रारंभ झाला. सदर बुद्धिबळ महोत्सव हा माजी नगरसेवक उदय पवार यांच्या मातोश्री यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केला आहे.
या स्पर्धेचे उदघाट्न सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पि. एल. रजपूत, आदिनाथ मगदूम, माजी नगरसेवक उदय पवार, संजय केडगे, केपीज चेस अकॅडेमीचे प्रमुख विजयकुमार माने, आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळाविकर यांच्या उपस्थित झाला.
प्रास्ताविक विठ्ठल मोहिते सर यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार आणि स्वागत- विजयकुमार माने यांनी केले.
प्रतिमा पूजन, दिपप्रज्वलन आणि पटावरील चाल खेळून स्पर्धेचे उदघाटन केले.
सदर स्पर्धेत तब्बल 362 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेसाठी सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, लातूर, या जिल्ह्यातून तसेच कर्नाटक या राज्यातील बेळगाव जिल्ह्यातून खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
८ वर्षाखालील गटात ६७ खेळाडू यामध्ये आरव पाटील, आदर्श दयम्मनवार, आदिराज डोईजड, सरनेश अग्रवाल, रिधान आत्तार, शौर्य धायगुडे, अनय दिंगकर, रिदम दोशी, वीर गड्डा, अव्दित गायकवाड यासह अनेक नामांकित खेळाडू सहभागी झाले आहेत.
८ वर्षाखालील गटात चौथ्या फेरीत केदार जोशीने आदर्श दयमन्नावरचा, आदिराज डोईजडने रिधान कारवाचा, रियांश कोतवालने वेदांन्त हळबेचा, रिशांक हन्नमण्णावरने दिया तोष्णीवालचा, जयराज काजवेने स्वरित गवंडीचा पराभव करून आपली विजयी आघाडी कायम केली. चौथ्या फेरीअखेर रियांश पोतदार, ऋषंक हन्नपण्णावर, आदिराज डोईजड, केदार जोशी ४ गुणासह संयुक्त प्रथम स्थानावर तर जयराज काजवे ३.५ गुणासह दुस-या स्थानावर आहे.
१२ वर्षाखालील गटात १८६ खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये क्षितीज कोळी, कश्यप खाखरीया, श्रीनिधी भोसले, विवान दासरी, आदित्य ठाकूर, प्रथमेश व्यापारी, वंशील ठक्कर, अवनीश जितकर, आशिष मोठे, शिवेंद्रसिंह शिंदे , आदित्य घाटे, अनुजा कोळी यांच्यासह २२ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू सहभागी झाले आहेत.
चौथ्या फेरीत क्षितीज कोळी, मंथन शहा , कश्यप खाकंरीया, अन्वय भिवरे प्रसन्नजित ईश्वर,आशिष मोठे, आराध्य ठाकूर देसाई, श्रवण ठोंबरे , शिवेंद्रसिंह शिंदे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवून ४ गुणासह आपली आघाडी कायम केली. आदित्य ठाकूरला अर्णव रहटाळने, प्रथमेश व्यापारीने अव्दिक फडकेने बरोबरीत रोखले. चौथ्या फेरीअखेर क्षितीज कोळी, मंथन शहा, आशिष मोठे, ईश्वर प्रसन्नजित,श्रवण ठोंबरे,आराध्य ठाकूर देसाई, कश्यप खाकंरीया, अन्वय भिवरे, शिवेंदर्सिंह शिंदे ४ गुणासह प्रथम स्थानावर तर प्रथमेश व्यापारी,अर्णव रहाटव्हळ,अव्दिक फडके, आदित्य ठाकूर ३.५ गुणासह संयुक्त दुस-या स्थानावर आहेत.
१६ वर्षाखालील गटात १०९ खेळाडू सहभागी झाले आहेत यामध्ये विक्रमादित्य चव्हाण, अभय भोसले, अर्जुन अडगळे, सौमित्र केळकर, सारा हरोले, राजदिप पाटील, व्यकंटेश खाडेपाटील, हर्ष धनवडे, अर्णव भस्मे, मनोज महाडेश्वर, अथर्व आलदर यांच्यासह २७ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूचा सहभाग आहे.
चौथ्या फेरीत सांगलीच्या विक्रमादित्य चव्हाणने प्रणव मोरेचा,अभय भोसलेने अर्णव शेडगेचा, सौमित्र केळकरनेसर्वेश पोतदारचा,अर्णव भस्मेने शार्विल येडेकरचा, मनोज महाडेश्वरने संस्कार काटकरचा, सारा हरोलेने वैभवी मुळीकचा, अर्जुन अडगळेने तनिष तेंडूलकरचा, राजदिप पाटीलने मृणाल जैनचा, हर्ष धनवडेने समर्थ कोरेचा पराभव करून आपली आघाडी कायम केली. व्यकंटेश खाडेपाटीलला पियुष मानेने बरोबरीत रोखले.
चौथ्या फेरीअखेर सौमित्र केळकर, अभय भोसले, मानस महाडेश्वर, विक्रमादित्य चव्हाण,अर्णव भस्मे ४ गुणासह संयुक्त प्रथम स्थानावर तर व्यंकटेश खाडेपाटील, सारा हरोले, पियुष माने ३.५ गुणासह संयुक्त दुस-या स्थानावर आहेत.
स्पर्धा समन्वयक म्हणून उदय पवार तर स्पर्धेचे आयोजन विजयकुमार माने तर स्पर्धा संयोजक म्हणून आंतरराष्ट्रीय पंच प्रशिक्षक पौर्णिमा उपळावीकर –माने काम पहात आहेत. सदर स्पर्धेसाठी पंचांची अनुभवी टीम कार्यरत आहे.
मुख्य पंच आरती मोदी, कोल्हापूर, मुख्य पंच करन परिट, इचलकरंजी, मुख्य पंच शाहरूख कुरणे, कसबे डिग्रज. तसेच अपर्णा शिंदे सातारा, सूर्याजी भोसले हुपरी, नाझिया पटेल मिरज, विजय सलगर इचलकरंजी, शंकर आडम इचलकरंजी, मोहिनी राजन डांगे हातकणंगले, हे इतर पंच म्हणून काम पाहत आहेत, तसेच सहाय्यक म्हणून पूजा धनवडे, अनिता भोसले, स्टिफन काकी, महेश व्यापारी प्रशांत जाधव. सुचेता देशपांडे हे काम पाहत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.