राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस
अमरावती : खरा पंचनामा
भाजपाचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.
'जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल, त्याला एक लाख रुपयाचे माझ्याकडून बक्षीस दिले जाईल' अशी थेट घोषणा बच्चू कडू यांनी केलीय. तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलाय.
तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे नाव राधाकृष्ण, कृत्य मात्र कंसाचं करायची असेल तर कंसाची ही अवलाद मुख्यमंत्र्यांनी हाकलून लावली पाहिजे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. फडवणीस साहेब ऐकीकडे कर्जमाफीची सुद्धा त्यांनी केली. फडवणीस साहेब ऐकीकडे कर्जमाफीची घोषणा करतात. तरदुसरीकडे हे वाचाळविळ मंत्री आहे जे असे वक्तव्य करतात. शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही, त्यामुळे ही नालायकी थांबवा, अशी प्रतिक्रिया हि बच्चू कडू यांनी यावेळीबोलताना दिली.
गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्र्यांसह नेत्यांची सुद्धा कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्ये करण्याची मालिकाच सुरु असून या यादीत आता विखे पाटील यांची भर पडली आहे. आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची मुक्ताफळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उधळली आहेत. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं, आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, हे अनेक वर्ष काम चालू असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलं आहे. विखे पाटील यांच्यावर शेतकरी नेत्यांसह सोशल मीडियातून सडकून टीकेचा प्रहार झाल्यानंतर आता शेतकरी नेते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी देखील सडकून टीका केलीय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.