Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाजपला शह देण्यासाठी काका-पुतण्याची होणार एकजूट?

भाजपला शह देण्यासाठी काका-पुतण्याची होणार एकजूट?

पिंपरी-चिंचवड : खरा पंचनामा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुण्यातही निवडणुकीसाठी पक्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सत्ता प्राप्त करण्यासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही प्रमुख गट अजित पवार गट आणि शरद पवार गट हे स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भाजपला शह देण्यासाठी एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संभाव्य युतीमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की, शरद पवार गटाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आघाडीसाठी प्रस्ताव आला आहे.

अलीकडेच महायुतीमधील मंत्री आणि अजित पवार गटाचे अनुभवी नेते हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने कोल्हापुरात शहर विकास आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली होती. या घडामोडीनंतर आता हाच पॅटर्न पिंपरी-चिंचवडच्या आगामी स्थानिक निवडणुकांमध्येही लागू होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासंबंधीचे अधिकार स्थानिक नेतृत्वाकडे सोपवले असल्याची माहिती समोर आली असून अजित पवार यांनीही अनेक अधिकार स्थानिक नेतृत्वाकडे सोपवले आहेत. यामुळे अनेक समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची एकहाती सत्ता उलथवून टाकण्यासाठी विरोधीपक्ष चांगलीच मेहनत करतांना दिसून येत आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाचे स्थानिक नेतृत्त्व निर्णायक भूमिका घेणार असल्याने, हा 'कोल्हापूर पॅटर्न' पिंपरीत यशस्वी झाल्यास, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या संभाव्य युतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे जुळवण्याची प्रक्रिया अतिशय वेगवान झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.