Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

IAS पत्नीचे IAS पतीवर गंभीर आरोप

IAS पत्नीचे IAS पतीवर गंभीर आरोप

जयपूर : खरा पंचनामा

राजस्थानमधील आयएएस अधिकारी असलेलं दाम्पत्य सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. आयएएस भारती दीक्षित यांनी आपल्या पतीवर गंभीर आरोप केल्यानं प्रशासनात खळबळ उडाली आहे. दारू पिऊन मारहाण करणे, अनैतिक संबंधांसाठी दबाव आणणे आणि पिस्तूल दाखवून धमकावल्याचे धक्कादायक आरोप त्यांनी आपल्या आयएएस पती आशीष मोदी यांच्यावर केले आहेत.

या प्रकरणी भारती दीक्षित यांनी 7 नोव्हेंबर रोजी एसएमएस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पती आशीष मोदी दारूच्या नशेत घरी वारंवार गोंधळ घालत असतात. त्यादिवशी त्यांनी नशेत घरात मोठा गोंधळ घातला आणि शारीरिक मारहाण केली. इतकंच नाही तर पिस्तूल दाखवत त्यांना धमकावलं. भारती दीक्षित यांच्या आरोपानुसार, घरातील खोलीत छुपे कॅमेरे बसवले होते आणि घटस्फोट घेण्यासाठी जबरदस्तीचा दबाव टाकण्यात आला होता.

तक्रारीत त्यांनी पुढे म्हटलं आहे की, दीर्घकाळापासून पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर पतीने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या सर्व प्रकारामुळे आता दोघांचा वैवाहिक वाद चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, हे दोघेही राजस्थान कॅडरचे अधिकारी आहेत. भारती दीक्षित सध्या राजस्थान सरकारमध्ये संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांचे पती आशीष मोदी हे सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागात संचालक पदावर आहेत. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पुढील चौकशीत आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.