Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काँग्रेस-भाजप नेत्यांमध्ये लाईव्ह शो मध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण

काँग्रेस-भाजप नेत्यांमध्ये लाईव्ह शो मध्ये लाथा-बुक्क्यांनी मारहाण

हैद्राबाद : खरा पंचनामा

लाईव्ह टीव्ही शोमध्ये राजकीय चर्चा सुरू असताना दोन नेत्यांमध्ये आरडाओराड, आरोप प्रत्यारोप हे काही नवीन नाही. पण हीच चर्चा मारहाणीत रूपांतर झाली तर गंभीर विषय आहे. तेलंगणातील भाजप आणि काँग्रेस नेत्यांचा राडा सगळ्या देशाने पाहिला. लाईव्ह टीव्ही शोमध्ये काँग्रेस आणि भाजपचे नेते शाळकरी पोरांप्रमाणे वाद घालत होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तेलंगाणामधील हैदराबादच्या जुबली हिल्स विधानसभेची पोट निवडणुकीच्या निकालावर यो यो टीव्हीवप चर्चा सुरू होती. हा कार्यक्रम लाईव्ह होता. हजारो लोक नेत्यांमधील डिबेट पाहत होते. पण या चर्चेसत्रात काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यामध्ये जोरदार राडा झाला. एकमेंकाना लाथा-बुक्क्यांनी मारले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. निकालावर चर्चा सुरू असतानाच दोन्ही नेत्यांचा पारा चढला अन् गोष्ट मारहाणीपर्यंत पोहचली.

लाईव्ह टीव्ही शो मध्ये काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्याचे रूपांतर वादात झाल्याचे व्हिडिओत दिसतेय. भाजप नेत्याने आधी काँग्रेस नेत्याला ढकलले, त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरात हाणामारी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसतेय. हा वाद सूत्रसंचालकाने थांबवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही नेत्याची हाणामारी सुरूच राहिली. या राड्यानंतर स्टुडिओमध्ये गोंधळ उडाला. अँकर शांत राहा शांता राहा ओरडत होता, पण यांचा राडा काही थांबत नव्हता. २१ सेकंदाचा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.