Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग, प्रक्षोभक भाषणं.. त्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये भयानक गुपितं

बॉम्ब बनवण्याचे ट्रेनिंग, प्रक्षोभक भाषणं.. 
त्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये भयानक गुपितं

दिल्ली : खरा पंचनामा

साधारण 10 दिवसांपूर्वी, म्हणजेज 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी राजधानी दिल्ली एका भयानक स्फोटाने हादरली. लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या या स्फोटाचा दणका फक्त दिल्लीला नव्हे तर संपूर्ण देशाला बसला.

या स्फोटात 12 जण मृत्यूमुखी पडले असून अनेक जखमी अद्यापी रुग्णालयात आहेत. या स्फोटाप्रकरणी आत्तापर्यंत अनेक मोठमोठ खुलासे झाले आहेत. तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या मोबाईलमधून विषारी भाषणांचे व्हिडिओही सापडले आहेत.

डॉ. मुझम्मिलच्या फोनमधून सुमारे 200 व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि आयसिसचा विखारी प्रचार तसेच बॉम्ब बनवणे आणि दहशतवादी प्रशिक्षणाशी संबंधित 80 व्हिडिओंचा समावेश आहे. तो तुर्कीयेमध्ये एका आयसिस कमांडरला भेटला आणि जैशच्या सूचनेनुसार बॉम्ब बनवण्यास मदत केली अशीही माहिती समोर आली आहे.

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आतापर्यंत अनेक डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दहशतवादी डॉक्टरच्या फोनवरूनही महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. तपासात मुझम्मिल, आदिल, शाहीन आणि इरफान या डॉक्टरांच्या फोनमधून डिलीट केलेला डेटाही जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मुझम्मिलच्या मोबाईल फोनवर जवळपास 200 व्हिडिओ सापडले, ज्यात जेईएस प्रमुख मसूद अझहर, असगर, इतर जेईएस कमांडर आणि अनेक आयसिसशी संबंधित दहशतवाद्यांच्या विषारी भाषणांचे ऑडिओ आणि व्हिडिओ समाविष्ट आहेत. तसचे 80 व्हिडीओ हे दहशतवादी ट्रेनिंग आणि बाँब बनवणे, केमिरल रिअॅक्शनशी निगडी रिसर्चचे आहेत.

मुझमिलच्या फोनमधून दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई आणि इतर अनेक राज्यांमधील धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या बाजारपेठांचे व्हिडिओ देखील जप्त करण्यात आले. 2022 साली मुझम्मिलच आणि डॉ. उमर यांनी तुर्कीमध्ये सीरियन आयसिस दहशतवादी कमांडरची भेट घेतली. जैशच्या एका कमांडरच्या सांगण्यावरून ही मीटिंग झाली. तिथेच दोघांनी बॉम्ब बनवण्यावर चर्चा केली. या सीरियन कमांडरने त्यांना बॉम्ब बनवण्यास मदत केली अशी माहिती उघड झाली आहे.

10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी वाजता, दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या पार्किंगजवळ एका i20 कारचा स्फोट झाला. त्यावेळी डॉक्टर उमर कार चालवत होता. आतापर्यंत या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटात दहशतवादी उमरही मारला गेला आहे. या स्फोटानंतर देशभरातील विविध भागात छापे टाकण्यात आले. आतापर्यंत दोन डझनहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.