Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील श्रीमती राजमती पवार बुद्धिबळ महोत्सवात दोशी, खाखरिया, भोसले विजेते

सांगलीतील श्रीमती राजमती पवार बुद्धिबळ महोत्सवात दोशी, खाखरिया, भोसले विजेते

सांगली : खरा पंचनामा

सांगलीत केपीज चेस अकॅडेमी आयोजित श्रीमती राजमती पवार बुद्धिबळ महोत्सवात 8 वर्षाखालील गटात सांगलीचा ह्रिदम दोशी, 12 वर्षाखालील गटात सांगलीचाच कश्यप खाखरिया, तर 16 वर्षाखालील गटात जांभळीचा अभय भोसले विजेता ठरला.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते तसेच चिदंबर कोटिभास्कर, प्रदीप पाटील, उद्योजक भट, काकासो पाटील, पि. एल. रजपूत, आदिनाथ मगदूम,  केपीज चेस अकॅडेमीचे विजयकुमार माने, पोर्णिमा उपळावीकर या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

 8 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचा सांगलीचा ह्रिदम दोशी विजेता तर ह्रियांश कोतवाल उपविजेता ठरला. पुढील विजेते अनुक्रमे रिधान कारवा, शिवराज कामटे आदिराज डोईजड रुशांक हणमंणावर, आरव पाटील समर्थ पवार, रिधान अत्तार, केदार जोशी. सर्वोत्कृष्ट मुली -  दिव्या तोशनिवाल,  मालू वाणी, माळी आरोही, कानिटकर शार्वी उपाध्ये अवनी.

12 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचा  सांगलीचा कश्यप खाखरिया विजेता तर आशिष मोटे उपविजेता ठरला. Pक्षितिज कोळीने तिसरा क्रमांक मिळवला. पुढील विजेते अनुक्रमे आराध्य ठाकूरदेसाई, अद्विक फडके, प्रसेणजित जांभळे, अन्वय भिवरे
श्रीनिधी भोसले, मंथन शाह, रठवाल अर्णव. उत्कृष्ट मुली - देशपांडे माधवी, हर्षदा सूर्यवंशी, अन्वी कुणाले, जाधव स्वरा, राठोड समृद्धी यांनी यश संपादन केले.

16 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत जांभळीचा अभय भोसले विजेता तर कोल्हापूरचा सर्वेश पोतदार उपविजेता ठरला. सांगलीचा सौमित्र केळकर याने तिसरा क्रमांक मिळवला. पुढील विजेते अनुक्रमे विक्रमदित्य चव्हाण, अर्जुन आदगले, मोरे प्रणव, माने पियुष, मानस महाडेश्वर, अर्णव शेडगे, मिहीर पिंपरकर यांनी यश संपादन केले. सर्वोत्कृष्ट मुली - सारडा नंदिनी, सारा हारोळे, शेवाळे ईश्वरी, मदने वेदिका, पांढरे सान्वी यांनी यश संपादन केले.

स्पर्धा समन्व्यक म्हणून उदय पवार, आयोजन केपीज चेस अकॅडेमीचे  प्रशिक्षक विजयकुमार माने तर स्पर्धा संयोजक म्हणून आंतरराष्ट्रीय पंच पोर्णिमा उपळावीकर - माने यांनी काम पहिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.