Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील टीईटी समस्याग्रस्त शिक्षकांच्या आंदोलनाला शिक्षण संस्था संघाचा पाठिंबा..सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठकीत ठराव

राज्यातील टीईटी समस्याग्रस्त शिक्षकांच्या आंदोलनाला शिक्षण संस्था संघाचा पाठिंबा..
सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठकीत ठराव

सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठक मा. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली. या बैठकीत राज्यातील टीईटी समस्याग्रस्त शिक्षकांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्याचा ठराव पारित करण्यात आला. या बैठकीत रावसाहेब पाटील यांनी २२ नोव्हेंबरला पुण्यात झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या बैठकीत झालेल्या कामकाजाचा वृत्तांत सांगितला.

आजच्या जिल्हा संघाच्या बैठकीत, 'पूर्वीप्रमाणे १२%वेतनेतर अनुदान मिळावे, खासगी शिक्षण संस्थांना शासनाने संपूर्ण घरपट्टी माफीचा शासन निर्णय तातडीने काढावा, घरगुती दराने पाणी बिल आकारणी करावी, पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे तातडीने शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करावी, पूर्वीप्रमाणेच वेतनश्रेणीवर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासन निर्णय तातडीने पारित करावा, पटसंख्येवर आधारित संचमान्यतेऐवजी पूर्वीप्रमाणे वर्गसंख्येवर आधारित संचमान्यता करुन शिक्षक संख्या निश्चित करणेत यावी व सार्वत्रिक निवडणुकीत वापरात घेण्यात येणाऱ्या शाळा महाविद्यालयांच्या प्रती वर्गखोलींचे दरदिवशी रु. ५०० प्रमाणे भाडे निवडणूक आयोगाने द्यावे असे ठराव पारित करण्यात आले.

या बैठकीत अध्यक्ष रावसाहेब पाटील, कार्याध्यक्ष प्रा. आर. एस. चोपडे, उपाध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे, सेक्रेटरी विनोद पाटोळे,  वैभव गुरव, दिग्विजय चव्हाण, प्राचार्य एस. के. पाटील व संस्थाचालक उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.