तोतया IAS महिला सहा महिने पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली; रूममधील गोष्टी पाहून पोलीसही चक्रावले
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील एका महिलेने तब्बल सहा महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत २०१७ च्या यूपीएससी निवड यादीची प्रत आढळली, ज्यात तिचे नाव ३३३ व्या क्रमांकावर होते. आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत तिच्या खात्यात अफगाणिस्तानातील बॉयफ्रेंड अशरफ खलील व पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यांतून मोठ्या रकमा आल्याचे समोर आले. दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटोही तिच्या मोबाइलमध्ये आढळून आले आहेत. संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरल्याने एटीएस व आयबीकडून महिलेची कसून चौकशी सुरू आहे. या महिलेचे नाव कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय 45) ही महिला तब्बल सहा महिन्यांपासून जालना रोडवरील अॅम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहात असल्याचं उघड झालं आहे.
तिच्याकडे UPSC च्या 2017 मधील निवड यादीची एक छापील प्रत पोलिसांना तपासादरम्यान आढळली आहे. ज्यात तिचं नाव 333 क्रमांकावर असल्याचा उल्लेख दिसून येत आहे. मात्र छाननीत ही यादीही बनावट असल्याचं निष्पन्न झालं आहे. बनावट ओळखपत्र देऊन हॉटेलमध्ये राहिल्याप्रकरणी तिच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
सदरील महिला ही जयपूर दिल्लीला सातत्याने गेल्याचे समोर आलं आहे. - ती दिल्लीच्या पावर मिनिस्ट्रीमध्येही अनेकांना भेटली. गृह विभागातही अनेकांना भेटल्याचा तिचा दावा आहे.
ज्यांना व्हिजा मिळत नाही त्यांना व्हीजा मिळून देण्याचं ती आश्वासन देते. मोठ्या बदल्याचं काम करण्याचं आश्वासन देखील ती देते. पुण्यातील एका माजी कुलगुरूचं ही बेस्ट आयएस अधिकारी, सामाजिक काम असल्याचे सर्टिफिकेट तिच्याकडे आहे. तिने ते बनवलं का खरोखर दिल याचा पोलीस तपास करत आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये ती राहत होती. तिचा मित्र अफगाणचा आहे, तो तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. सदरील मित्राची आई आणि भाऊ पाकिस्तानमध्ये राहतो या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना भेटल्याचा तिचा दावा आहे. प्रति दिवस सात हजार रुपये भाडं असलेल्या शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिन्यांपासून आईसोबत वास्तव्यास होती.
या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणी सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून याबाबतचे कागदपत्र त्यांनी शेअर केले आहेत. महाराष्ट्रात संशयास्पद परदेशी संबंध असलेल्या बनावट आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे,
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.