उठाबशांमुळे नाहक बळी गेलेल्या आशिकाच्या मृत्यूची चौकशी, हायकोर्ट रजिस्ट्रारचे पोलिसांना आदेश
मुंबई : खरा पंचनामा
१०० उठाबशा काढण्याच्या शिक्षेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार ज्युडिशियलने गंभीर दखल घेतली. मुलीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश रजिस्ट्रारनी मीरा-भाईंदर आणि वसई-विरारचे पोलीस आयुक्त तसेच वसई-विरार पालिकेला दिले आहेत. त्यामुळे मुलीच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
सहावीतील शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शाळेच्या बॅगेसह १०० उठाबशा काढायला लावण्यात आल्या. याप्रकरणी अॅड. स्वप्ना कोदे यांनी उच्च न्यायालयाला पत्र लिहिले. त्याला अनुसरून उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार ज्युडिशिअलने चौकशीचे प्रशासकीय निर्देश दिले आहेत. वसई-विरार आणि मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त तसेच वसई-विरार पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार या प्रकरणाची चौकशी करावी आणि अॅड. स्वप्ना कोदे यांना संबंधित चौकशीच्या तपशिलाबाबत लवकरात लवकर माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाने विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या घटनेची दखल घ्यावी तसेच सरकार आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावावी, शाळा व्यवस्थापन आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशा मागण्या अॅड. कोदे यांनी केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार ज्युडिशिअल कार्यालयाने चौकशीचे निर्देश दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.