सांगलीतील वानलेसवाडी परिसरात बिबटयाचा वावर : शहरात खळबळ
सांगली : खरा पंचनामा
सांगली वनविभागातील मिरजमधील कुंभार मळा या ठिकाणी बिबट्याचे ठसे गुरुवारी दिसून आले होते. त्यानंतर आता रविवारी मध्यरात्री वालनेसवाडी परिसरात भारती हॉस्पिटल समोरील मिरज-सांगली रोडला सुमारास बिबटया दिसला आहे. सांगली शहरात बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे.
गुरुवारी बिबट्याच्या ठस्यांची खात्री झाल्यानंतर वन विभागामार्फत या परिसरामध्ये वनविभागाचे जलद कृतीदल बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. मात्र रविवारी रात्री तो दिसून आला आहे. ही बातमी खरी असून रात्री वन विभागाचे कर्मचारी तसेच जलद कृतीदल व पोलिस यांचेमार्फत संयुक्त पणे भारती हॉस्पिटल परिसर वालनेस वाडी परिसर, विजयनगर, हसणी आश्रम, वालचंद कॉलेज परिसर, विश्राम बाग या भागात गस्त करत पाहटे पर्यंत पाहणी केली आहे. या परिसरात बिबट्या असल्याचे नाकारता येत नाही. आज पर्यंत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. बिबट्याकडून पशुधन अथवा मनुष्यहानी किंवा त्यावरती हल्ला झालेली घटना कोठेही घडलेली नाही. तरी सुध्दा सदर परिसरातील व आसपासच्या सर्व नागरीकांना दक्षता घेण्याची सूचना वन विभागामार्फत करण्यात आली आहे.
या परिसरामध्ये वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावलेले असून संपूर्ण परिस्थितीवर वन विभाग, जलद कृती दल व पोलिस लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता बिबटया बाबत कांही अस्तित्व किंवा कांही घटना आढळून आल्यास त्वरीत वन विभाग सांगली टोल फ्री क्रमांक १९२६ व ८७८८०३८५३६, ९०४९४२७४७९ या भ्रमणध्वनीवर तात्काळ संपर्क साधणेचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.