Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"एक व्यक्ती आपल्यात नाही, याची उणीव भासतेय.."

"एक व्यक्ती आपल्यात नाही, याची उणीव भासतेय.."

बीड : खरा पंचनामा 

राज्यभर गाजलेल्या संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची भरसभेत धनंजय मुंडे यांनी आठवण काढली. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी, काय चुकलं.. काय नाही, हे न्यायव्यवस्था बघेल, असं म्हणत आपली भूमिका मांडली आहे.

जाहीर सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, आपल्याकडे जे काही असेल त्या माध्यमातून आपण गोरगरीबांना मदत करीत होतो.. पण ९-१० महिने झाले ते काम बंद आहे. कार्यालय चालू आहे.. हे सगळं बोलत असताना आपला एक व्यक्ती आपल्यात नाही, याची उणीव मला होतोय.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, माझ्यासारख्या सहकाऱ्याला सहकार्य करतो म्हणून मलासुद्धा याची जाणीव करुन द्यावी लागेल. काय चुकलं, काय नाही.. ते न्यायव्यवस्था बघेल. आज काही महिने आम्ही कमी पडलो असलो तरी येणाऱ्या चार वर्षांत ही कमतरता भरुन काढण्याची जबाबदारी मी घोतो.

धनंजय मुंडे नेमके कुठे बोलत होते, हे कळलेलं नाही. मात्र परळीत कुठल्यातरी प्रचारसभेत ते बोलत होते, असं सांगितलं जातंय. धनंजय मुंडे यांच्या बोलण्याचा रोख पूर्णपणे वाल्मिक कराड असल्याचं दिसून येतंय. ज्या व्यक्तीने अत्यंत क्रूरपणे एका निष्पाप सरपंचाचा बळी घेतला त्याच्याविषयीचा धनंजय मुंडे यांचा मैत्रभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे.

धनंजय मुंडे यांनी आजवर कधीच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नाही किंवा वाल्मिक कराडच्या क्रूत्याबद्दल शब्दही काढलेला नाही. उलट संधी मिळेल तेव्हा त्यांनी आपणच कसे बरोबर आहोत किंवा आपल्याला, आपल्या समाजाला कसं टार्गेट केलं जातंय, हेच सांगत आलेले आहेत. त्यात पुन्हा आजचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांना पुन्हा टीकेला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, हा अतिशय थर्ड क्लास माणूस आहे. बीडमध्ये काय परिस्थिती आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यात हे लोक असं बोलत असतील तर नक्कीच निषेध करावा तेवढा कमी आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.