Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या नराधमास १० वर्षांची कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या नराधमास १० वर्षांची कारावासाची शिक्षा

सांगली : खरा पंचनामा

नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास भा.दं.वि.सं. कलम ३७६ (३) सह ५११ मध्ये १० वर्षे सक्तमजुरी व दंड दहा हजार रुपये व दंड न भरल्यास ४ महिने साधी कैद, ३७६ (२) (एफ) (एल) सह ५११ मध्ये ५ वर्षे सक्तमजुरी व दंड पाच हजार रुपये व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद, पोक्सो कायदा कलम ८ नुसार ५ वर्षे सक्तमजुरी व दंड पाच हजार रुपये व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पिडीतेवर झाले अत्याचारापोटी तिला भरीव नुकसानभरपाई शासनाकडुन मिळणेबाबत आवश्यक ते निर्देश न्यायनिवाड्यादरम्यान देण्यात आले. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.४, जे. ए. मोहंती यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता आरती आनंद देशपांडे-सातविलकर यांनी काम पाहिले.

चंद्रकांत मधुकर लोंढे (वय २६, रा. आण्णाभाऊ साठे चौकजवळ, सोनी, ता.मिरज, जि. सांगली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 

पीडिता त्याच्या नात्यातील आहे. त्याने तिला फोनवर मेसेज करुन घराबाहेर रात्री दोन वाजता बोलावले. तिला कुमठा फाटा येथील शेतामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुस-या दिवशी पिडीत मुलीला आरोपीच्या काकाने घरी आणून सोडले. त्यानंतर पिडीत मुलीला तिचा भाऊ पोलीस ठाण्यात घेऊन आला. त्यावेळी तिची आई मुलगी हरवलेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. त्यावेळीच पिडीत मुलीने आरोपीने केलेली सगळी हकीकत आईला सांगितली. त्यानंतर आईने आरोपीविरुध्द मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्कार, अपहरण, पोक्सो कलम ८ नुसार तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी या गुन्ह्याचा तपास केला. या तपासामध्ये त्यांनी घटनास्थळ, आरोपीचे व पिडीतेचे कपडे जप्ती पंचनामा केला. त्यानंतर दोषारोपपत्र दाखल केले. 2021 मध्ये ही घटना घडली होती.

या खटल्यात सरकारपक्षातर्फे एकुण १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीतेची व पिडीतेच्या आईची साक्ष बहुमुल्य ठरली. पिडीतेने दिलेला जबाब व आईचा झालेला जबाब हे एकमेकांना पुरक होते. पिडीतेने आरोपीने केलेला गुन्हा पुर्णपणे सविस्तरपणे सांगितलेला आहे. त्याचबरोबर तपासी अधिकारी यांनी केलेल्या तपासात पिडीता ही घटनेच्यावेळी अल्पवयीन होती व आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. सर्व साक्षीपुराव्यांचा विचार करुन न्या. जे. ए. मोहंती यांनी कारवास आणि दंडाची शिक्षा सुनावली.

यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथील शामकुमार साळुंखे तसेच पैरवी कक्षातील रेखा खोत, सुनिता आवळे, वंदना मिसाळ व कोर्ट ऑर्डरली परीट यांचे सहकार्य लाभले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.