Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आम्ही कोणत्याही एका पक्षाचे नाही,...तर काँग्रेसलाही पाठिंबा देऊ!

आम्ही कोणत्याही एका पक्षाचे नाही,...तर काँग्रेसलाही पाठिंबा देऊ!

बंगळूरू : खरा पंचनामा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. संघ कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाचे समर्थन करत नाही, तर धोरणांचे समर्थन करतो. आम्ही राष्ट्रनीतीचे समर्थक आहोत, राजनीतीचे नाही, असे विधान करताना मोहन भागवत यांनी काँग्रेसचाही उल्लेख केला.

बेंगलुरू येथील एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांच्या विधानामुळे चर्चाना उधाण आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधील नाते वेगळे सांगण्याची गरज नाही. कार्यक्रमात त्यांना राजकीय पक्षांबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना केलेल्या विधानामुळे उपस्थितही अवाक झाले.

राजकीय पक्षांविषयी बोलताना सरसंघचालक म्हणाले, आम्ही कोणत्याही एका राजकीय पक्षाचे समर्थन करत नाही. आम्ही निवडणुकीच्या राजकारणात सहभाग घेत नाही. संघ समाजाला एकजुट करण्याचे काम करतो आणि राजकारण विभाजनकारी असेत. आम्ही धोरमांचे समर्थन करतो.

याचे उदाहरण द्यायचे झाले तर, आम्हाला अयोध्येत राम मंदिर हवे होते. त्यामुळे आमचे स्वयंसेवक त्याच्या उभारणीसाठी उभे राहिले. भाजपने हा मुद्दा उचलून धरला. जर काँग्रेसनेही याचे समर्थन केले असते तर आमच्या स्वयंसेवकांनी त्या पक्षाला मते दिली असती, असे विधान भागवत यांनी यावेळी केले.

कोणत्याही एका विशिष्ट पक्षासोबत आमचे विशेष संबंध नाहीत. कोणताही एक पक्ष आमचा नाही, सर्व पक्ष आमचे आहेत, कारण ते भारतीय पक्ष आहेत. आमचे काही विचार आहेत. देश एका विशिष्ट दिशेने पुढे जावा, असे आम्हाला वाटते. जे लोक देशाला त्या दिशेने पुढे घेऊन जातील, आम्ही त्यांचे समर्थन करू, असेही भागवत म्हणाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.