Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"देवेंद्र यांच्याकडे खात्यावर पैसेच नसतात, मीच पैसे वाचवते आणि गुंतवणूक करते"

"देवेंद्र यांच्याकडे खात्यावर पैसेच नसतात, मीच पैसे वाचवते आणि गुंतवणूक करते"

मुंबई : खरा पंचनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कर्ली टेल्स या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. वर्षा बंगल्यात दिवसाची सुरुवात कशी होते इथंपासून ते घरात कोण कोण असतं? कुणाच्या सवयी कशा आहेत यांसारख्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली.

फडणवीस यांना मध्यरात्री उठून किचनमध्ये जाऊन कायतरी खायची सवय आहे. त्यांच्या आवडीचे चॉकलेट खातात असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? लग्नानंतर प्रत्येकाचं आयुष्य बदलतं, तुमचंही बदललं का? कसं? या प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी सांगितलं की, दिविजाचा जन्म झाल्यानंतर तिच्यासाठीच सगळं असं ठरलं. पण देवेंद्रजींनी त्यावेळी नोकरी न सोडता तिच्यासोबत वेळ घालव असं सांगितलं. तिनं पहिली पावलं टाकली तेव्हा मी ते मोबाईलवर पाहिलं. लग्नानंतरही काम करता आलं. फडणवीसजी आमदार होते तरी मी काम करत होते. स्वतःच्या पैशांची गुंतवणूक कशी करायची हे मला यामुळे शिकायला मिळालं असंही अमृता फडणवीस यांनी सांगितलं. बँकिंग क्षेत्रात कामाचा अनुभव असल्यानं फडणवीस आर्थिक बाबतीत सल्ला घेतात का? असं अमता फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर त्या म्हणाल्या की, माझ्या पैशांचं नियोजन मीच करते, घरच्या पैशांचंही नियोजन करते. देवेंद्र यांच्याकडे खात्यावर पैसेच नसतात. मीच पैसे वाचवते आणि गुंतवणूक करते. आमदार म्हणून फडणवीसजींना जे पैसे मिळतात तेही कुठे जातात माहिती नाही. मी कधी त्याबाबत विचारलंही नाही.

फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा काय वाटलं? कशी प्रतिक्रिया होती? असा प्रश्न विचारला असता अमृता फडणवीस यांनी सांगितलं की, फडणवीस पहिल्यांदा प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा दिविजाचा जन्म झालेला. त्यावेळी लोक म्हणायचे की ते मुख्यमंत्री होणार आहेत. मी बोलायचे की काय बोलत आहात, असं बोलू नका, अशा अफवा पसरवू नका. गंमतीने बोलतायत असं वाटायचं. पण खरंच बनले तेव्हा सरप्राइज होतं. मोदींनी तो निर्णय घेतला होता.

मोदींना की फडणवीसना मत देणार असं विचारलं असता अमृता फडणवीस यांनी मोदीजींना मत देईन असं सांगितलं. मी फक्त एकाच व्यक्तीची फॅन आहे, ते म्हणजे मोदीजी. मोदीजी आवडते व्यक्ती आहेत असं त्या म्हणाल्या. सर्वाधिक राग कशाचा येतो या प्रश्नावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, पाठित खंजीर खुपसणाऱ्यांचा जास्त राग येतो. जे लोक धोका देतात त्यांचा राग येतो.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.