'निवडणूक सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, आधीही आरोप झाले त्यातून काही पुढं आलं नाही'
पुणे : खरा पंचनामा
पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणावरून राज्यात सुरू असलेल्या चर्चादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले की, 'मी आयुष्यात कधीही चुकीचं काम केलं नाही.
माझ्या नावाचा वापर करून कोणावरही दबाव आणू नका. चुकीचं काम आजवर केलं नाही आणि पुढेही करणार नाही.' पवार म्हणाले की, 'मधल्या काळात काही घटना घडल्या, त्याची चौकशी सुरू आहे. एका महिन्यात वस्तुस्थिती समोर येईल. एक रुपया न भरता कागद कसा तयार झाला हे पाहून मी स्वतःही आश्चर्यचकित झालो. नेमकं काय झालं हे लवकरच समोर येईल. पण निवडणुका सुरू की आरोपांची मालिका सुरू होते. आधीही आमच्यावर आरोप झाले, पण त्यातून काहीच पुढे आलं नाही. मात्र बदनामी मात्र होते.'
अजित पवार म्हणाले की, 'घटनेचा आदर करायचा आहे. चुकीचं झालं तर त्यावर बोलू शकतो, पण प्रत्येक वेळी बारामतीचं नाव पुढं करून राजकारण करायची पद्धत अयोग्य आहे. मी कधीही चुकीचं केलं नाही, आणि पुढेही करणार नाही.' अजित पवार यांनी शेवटी ठाम शब्दांत सांगितलं की, 'राजकारणात अनेक चढ-उतार आले, पण मी समाधानी आहे. काम करून दाखवणं हीच माझी ओळख आहे, आणि राज्यात लक्ष ठेवूनच पुढचं प्रत्येक पाऊल उचलणार आहे.'
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, 'सोमवार ते शुक्रवार आम्ही राज्याचा आढावा घेतला. बारामतीत चाचपणी केली. बारामती आघाडीवर लढली जायची ही परंपरा होती. पण मी सक्रिय झाल्यावर ठरवलं की पक्षाच्या नावावर लढायचं. पक्षविरोधी कृती झाल्यास कारवाई करता येते.' ते पुढे म्हणाले, 'महाराष्ट्रात 9 वर्षांनी 288 नगरपरिषद आणि पंचायत निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर मी बारामतीसह राज्यभर लक्ष ठेवून आहे. पुढच्या पाच वर्षांत शहराचा कायापालट करायचा आहे, ही जबाबदारी माझी आहे.' उमेदवारी प्रक्रियेबाबतही त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन दिलंः 'ज्यांना माझ्या बाजूने फॉर्म भरायचे आहेत त्यांनी बुधवारपर्यंत फॉर्म भरू नका. गुरुवारी सकाळी मी स्वतः मुलाखती घेणार आहे. त्यानंतर एक मेळावा घेऊन प्रचाराची दिशा ठरवू.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.