वंदे मातरम् गौरव यात्रेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील पदयात्रेत घेतला सहभाग
पुणे : खरा पंचनामा
‘वंदे मातरम्’ या बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या अजरामर गीताला यंदा १५० वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त शनिवारी पुणे येथे वंदे मातरम् गौरव समिती यांच्या वतीने भोपळे चौक, कॅम्प ते पंडित दिनदयाळ उपाध्याय चौक, अरोरा टॉवर्स दरम्यान वंदे मातरम् गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सहभाग घेतला.
या प्रसंगी संपूर्ण परिसर तिरंगामय होऊन “वंदे मातरम्” च्या जयघोषात वातावरण बदल देशभक्तीने भारून गेले होते. “वंदे मातरम्” हा केवळ एक जयघोष नाही, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा आहे. राष्ट्रप्रेम, त्याग, निष्ठा आणि अभिमान यांचा संगम असलेला हा घोष आजही प्रत्येक भारतीयाच्या शिरात उर्जा निर्माण करतो. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत समाजातील सर्व घटक सर्वांनी एकदिलाने सहभाग नोंदवला. पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ही यात्रा साकार झाली. ही यात्रा केवळ एक कार्यक्रमच नव्हती, तर ती होती संस्कृतीचा उत्सव, राष्ट्रभक्तीची जाणीव आणि भारतमातेप्रती कृतज्ञतेचा संकल्प होता.
या पदयात्रेस केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, माजी केंद्रीय मंत्री प्रकाशजी जावडेकर, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच असंख्य राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.