राज्य सरकारकडून वर्ल्डकप विजेत्या स्मृती, जेमिमा अन् राधा यांच्यावर बक्षीसांचा वर्षाव
मुंबई : खरा पंचनामा
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून संपूर्ण जगात देशाचा मान वाढवला आहे. या टीम इंडियावर आता सर्वचस्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. नुकतच या टीम इंडियाने दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. त्यानंतर आता या संघातील खेळाडून आपल्या शहरांमध्ये परतत आहेत, या ठिकाणी देखील या खेळाडूंचे जोरदार स्वागत होत आहे. या खेळाडूंवर केवळ कौतुकाचाच नाहीतर बक्षासांचाही वर्षाव सुरू आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) मुंबईत एका विशेष सत्कार समारंभात महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील तीन स्टार खेळाडू स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांचा सन्मान केला. मुख्यमंत्र्यांनी तिन्ही खेळाडूंना सव्वादोन कोटी रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान केले आणि त्यांना महाराष्ट्राचा अभिमान म्हटले.
दक्षिण मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा सत्कार समारंभ दक्षिण मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा सत्कार समारंभआयोजित करण्यात आला होता, जिथे फडणवीस म्हणाले की भारतीय संघाच्या विजयाने देशातील प्रत्येक तरुणीला खेळात रस घेण्यास आणि जागतिक स्तरावर चमकण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.
याशिवाय, मुख्यमंत्री फडणवीस असंही म्हणाले की, जगाने पाहिले की हा विश्वचषक पहिल्यांदा जिंकला, जो आतापर्यंत पारंपारिकपणे निवडक देशांकडे जात होता. याचबरोबर त्यांनी संघाचे प्रशिक्षक अमोल मजुमदार यांना साडेबावीस लाख रुपयांचा धनादेश दिला, तर सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला ११ लाख रुपये मिळाले.
याप्रसंगी विश्वविजेत्या संघाची उपकर्णधार स्मृती मानधना म्हणाली, "मुंबईत सन्मान मिळणे आमच्यासाठी खूप खास आहे. महाराष्ट्राने नेहमीच आम्हाला पाठिंबा दिला आहे. २०१७ मध्ये आम्ही उपविजेतेपदापर्यंत पोहोचलो तेव्हाही राज्याने आमचा सन्मान केला होता. आमच्या कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट टीमशिवाय हा विजय शक्य झाला नसता."
तर प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले, "जेव्हा आम्ही मुंबईत आलो तेव्हा संघाला विश्वास होता की काहीतरी ऐतिहासिक घडेल. या खेळाडूंनी विश्वचषक जिंकण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी दिवसरात्र काम केले."
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.