बिहारमध्ये खासदार शांभवी चौधरींनी दोन वेळा मतदान केलं?
व्हिडीओत दाखवली दोन्ही हातांच्या बोटावरील शाई
पटना : खरा पंचनामा
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील १२१ जागांसाठी मतदान पार पडले. मतदान होण्याच्या एक दिवस आधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या गडबडीबाबत मोठे आरोप केले.
त्यानंतर आता बिहारच्या निवडणुकीत एका खासदाराने दुबार मतदान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) एनडीएचा मित्रपक्ष आहे. या पक्षाच्या खासदार शांभवी चौधरी यांनी बुधवारी मतदान केल्यानंतर दोन्ही हातांच्या बोटांना शाई असल्याचे दाखवले.
शांभवी चौधरी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. एएनआय वृत्तसंस्थेनेही हा व्हिडीओ शेअर केला आहे. मतदान करून बाहेर आल्यानंतर खासदार शांभवी चौधरी उजव्या हाताच्या बोटावर शाई लावली असल्याचे दाखवतात. पण इतर लोकांनी डावा हात दाखवल्याचे पाहून त्या लगेच त्यांचा डावा हात वर करतात. तेव्हा त्यांच्या डाव्या हाताच्या बोटालाही शाई लावल्याचे दिसले.
खासदार शांभवी चौधरी यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर दोन वेळा मतदान केल्याचा आरोप केला आहे.
बुधवारी एका मतदानकेंद्राबाहेर चित्रित केलेल्या व्हिडीओमध्ये २७ वर्षीय शांभवी चौधरी त्यांचे वडील आणि जद (यू) नेते अशोक चौधरी आणि आई नीता चौधरी यांच्यासह माध्यमांना मतदान केल्याची पोज देत होते. बुद्ध कॉलनीतील सेंट पॉल स्कूलमध्ये मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांना शाई लावलेले बोट दाखवले. मात्र दोन्ही हातावरील शाई दाखवल्यामुळे आता शांभवी चौधरी यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.