Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बैठकीला दोन मिनिटं उशीर झाला, काँग्रेसनं राहुल गांधींना दिली शिक्षा...

बैठकीला दोन मिनिटं उशीर झाला, काँग्रेसनं राहुल गांधींना दिली शिक्षा...

पंचमढी : खरा पंचनामा

प्रशिक्षण शिबिरात पोहोचण्यात दोन मिनिटं उशीर झाल्याने काँग्रेसने राहुल गांधी यांना शिक्षा दिली आहे. यावेळी त्यांना १० पुशअप काढण्यास सांगण्यात आलं. नियम सर्वांसाठी सारखा असल्याचंही यावेळी काँग्रेसच्या नेत्यानं म्हटलं.

दरम्यान, राहुल गांधींचा पुशअप काढण्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मध्यप्रदेशच्या पचमढी येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत हे शिबीर चालणार आहे. राहुल गांधी यांनीही या प्रशिक्षण शिबीराला हजेरी लावली. मात्र, या ठिकाणी त्यांना पोहोचायला दोन मिनिटं उशीर झाला. त्यामुळे त्यांना १० पुशअप काढण्याची शिक्षा देण्यात आली.

यासंदर्भात बोलताना, काँग्रेसचे मिडिया समन्वयक अभिनव बरोलिया म्हणाले, खरं तर राहुल गांधींनी अशाप्रकारे पुशअप काढणं नवीन नाही. यापूर्वी त्यांनी अशाप्रकारे पुशअप काढल्या आहेत. मुळात आमच्या पक्षात एक शिस्त आहे. नियम सर्वांसाठी सारखे आहेत. आम्ही त्याचं पालन करतो. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. भाजपप्रमाणे आम्ही तानाशाहीने पक्ष चालवत नाही.

दरम्यान, मध्यप्रदेश काँग्रेसतर्फे प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्याचं प्रशिक्षण शिबीर आयोजित केलं जातं आहे. याची सुरुवात भोपाळपासून झाली. आता पचमढी येथे आयोजित करण्यात आलं आहे. संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने ही शिबिरं आयोजित केली जाते आहे. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना याशिबीराला वेळेत उपस्थित राहणं अनिवार्य करण्यात आलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.