लाचप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षकावर पोलीस महासंचालकांकडून बडतर्फीची कारवाई
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईच्या वडाळा टीटी पोलीस ठाण्याच्या तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक यांच्यावरीलकारवाई संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वडाळा टी.टी. पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे (वय 52) आणि पोलिस उपनिरीक्षक राहुल वाघमोडे (वय 37) यांच्या विरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) कारवाईनंतर आता पोलीस महासंचालकांनी या दोन्ही अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ट्रॅप झालेले वडाळा टी टी पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत सरोदे (52) आणि उपनिरीक्षक राहुल वाघमोडे (37) यांच्या विरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलीस महासंचालकांनी या दोन्ही अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मुलीस आरोपी न करण्याबरोबर गुन्ह्यात मदत करण्यासाठी व विरुद्ध गटातील व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी चंद्रकांत सरोदे यांनी तक्रारदाराकडे पाच लाख 50 हजाराची मागणी केली होती. त्यापैकी दोन लाख 30 हजार घेताना वडाळा टी टी पोलीस ठाण्यातील केबिनमध्येच सरोदे यांना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. शिवाय राहुल वाघमोडे यांनाही 30 हजार घेताना पकडले होते. लाच प्रकरणात दोघांनाही अटक झाल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती.
दरम्यान, पोलीस दलातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी दोघांवर कठोर कारवाई करण्याची शिफारस पोलीस आयुक्तांकडून पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली होती. त्यानुसार 311 अन्वये पोलिस महासंचालकांनी दोन्ही अधिकाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.