Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणूक लढणार?

शरद पवार आणि अजित पवार एकत्र निवडणूक लढणार?

कोल्हापूर : खरा पंचनामा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांबाबत, शरद पवार गट आणि अजित पवार गट-पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांनी राज्याच्या राजकीय पटलावर नवीन प्रश्न उभे केले होते. आणि आता यावर पहिलं ठोस संकेत कोल्हापूरच्या चंदगड नगर पंचायतीतून मिळाला आहे. येथे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. म्हणजेच, शरद पवार आणि अजित पवार एकाच बाजूने उभे राहणार, हे स्पष्ट झालं आहे.

ही युती केवळ एका नगर पंचायतीपुरती मर्यादित राहणार का, की तिचा प्रभाव राज्यातील इतर नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांवरही दिसेल, हे पाहणं आता राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

चंदगड नगर पंचायतीत दोन्ही राष्ट्रवादी गटांनी हातमिळवणी केली असून ही निवडणूक युतीतून लढवण्याचा निर्णय जाहीर झाला आहे. माजी आमदार राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर हे दोघे एकत्रितपणे निवडणुकीत मैदानात उतरणार आहेत. या समन्वयात मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती मिळते. संयुक्त पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे.

आता सर्वांचं लक्ष या दिशेने लागलं आहे की, चंदगडप्रमाणेच राज्यातील इतर नगरपंचायती, नगरपालिका आणि महापालिकांमध्ये देखील ही 'पुण्याई युती' दिसणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

दरम्यान, रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक निवडणुकीत उमेदवार निवडीसंदर्भात महत्त्वाचे दिशानिर्देश देण्यात आले. ओबीसी आरक्षित प्रभागांमध्ये तेथील मूळ ओबीसी समाजातील व्यक्तींनाच उमेदवारी देण्याचा आग्रह शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच जिथे योग्य ओबीसी उमेदवार उपलब्ध नाही, तिथे कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना संधी द्यावी, अशा सूचना खासदार-आमदारांना देण्यात आल्या.

यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या धोरणात आणि रणनीतीत बदल होत असल्याचे स्पष्ट दिसत असून, पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक ठिकाणी नवीन गठबंधनांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.