ॲड. प्रमोद भोकरे यांना "राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२५" पुरस्कार प्रदान
सांगली : खरा पंचनामा
आष्टा येथील ईगल फाउंडेशनतर्फे सांगली जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रमोद लक्ष्मीबाई अंकुश भोकरे यांना “राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कार २०२५” पद्मश्री दादा विधाते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
ईगल फौंडेशन चा गुणगौरव सोहोळा उत्साहात संपन्न झाला. ईगल फौंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त आष्टा येथील डॉ. अण्णासाहेब डांगे शिक्षण संकुलात हा पुरस्कार वितरण समारंभ अत्यंत दिमाखात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. सांगली जिल्ह्याचे मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी विधिक्षेत्रातील विविध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम बघताना जन्मठेपेसहित अनेक शिक्षा गुन्हेगाराना देत अनेक खटले जिंकले व पीडिताना न्याय मिळवून दिला, तसेच त्यांनी दिलेल्या इतर सामाजिक व धार्मिक उपक्रमातील योगदानाबद्दल भोकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, मानाचा फेटा बांधून गौरविण्यात आले. यावेळी पद्मश्री दादा इदाते, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर, ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, सौ. संगिता शिंदे, शिरीष कुलकर्णी, डॉ. शंकर अंदानी, काकासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले तर आभार प्रा. महेश मोटे यांनी मानले. सुत्रसंचालन पोपट काटकर यांनी केले.
या सोहोळ्यासाठी फाऊंडेशनचे पदाधिकारी बाबासाहेब राशिनकर, अभिजित पाटील, अशोक शिंदे, संजय गायकवाड, दिनेश कांबळे, दिपक पोतदार, प्रा. दिलीप जाधव, प्रकाश वंजोळे, प्रा. विजय जगताप, संजय थोरात, सतिश भोसले, डॉ. शिवप्रसाद कनाडे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.