कॉल सेंटर रॅकेट : मास्टरमाइंड राजवीरला घेऊन पोलिसांचे पथक गुजरातला
लेडी सिंघम गीता बागवडे यांच्या टीमकडे तपास
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
अमेरिकन लोकांना ऑनलाईन गंडा घालण्याऱ्या कॉल सेंटर रॅकेटला फंडिंग करणाऱ्या राजवीर प्रदीप शर्मा (२२, रा. वल्लभनगर, अहमदाबाद) याला घेऊन पोलिसांचे एक पथक शनिवारीच रात्री अहमदाबादला धडकले. रविवारी पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. त्यात अनेक महत्त्वाचे धा-गेदोरे हाती लागले आहेत. त्याचा काका बलवीर वर्मा ऊर्फ पाजी याचा पथक गुजरातमध्ये शोध घेत आहे. दरम्यान, या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही तपासात समोर आले आहे. लेडी सिंघम असलेल्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांची टीम या प्रकरणाचा तपास करत आहे.
अधिक माहितीनुसार, अमेरिकन लोकांना धमकावून पैसे उकळण्यासाठी बलवीर वर्मा ऊर्फ पाजी यानेच सिंडिकेट तयार केली. त्याला जॉन नामक व्यक्तीने ही आयडिया दिली होती. त्यासाठी वमनि त्याचा पुतण्या राजवीरला या कामात सोबत घेतले. छत्रपती संभाजीनगर येथे फारुकीशी संपर्क होतच तोही सिंडीकेटमध्ये सहभागी झाला.
चिकलठाणा एमआयडीसीत इमारतीचे दोन मजले भाड्याने घेतले. दिल्ली येथून नॉर्थ ईस्टच्या १०० ते १५० तरुण-तरुणींना कॉल सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून आणण्यात आले. त्यांना अमेरिकन इंग्लिश बोलण्याचे प्रशिक्षण दिले. जॉनकडून अमेरिकन लोकांचा डेटा मिळविला. आरोपी सतीश लाडे याने सॉफ्टवेअर, हार्डवेअर, सर्व्हर, डार्कनेटची यंत्रणा सुरू करून तोही कामाला लागला.
डेटानुसार, डायलर लोकांना कॉल करून टॅक्स चोरीची धमकी देऊन पैसे उकळू लागले. ही रक्कम गिफ्ट कार्ड रीडिम करून क्रिप्टो वॉलेटमधून हवाला मार्फत भारतात येऊ लागली. ४५ टक्के जॉनचे तर ५५ टक्के वर्मा अशी वाटणी व्हायची. राजवीरच्या रूमची झडती घेताना पोलिसांना त्याच्या लॅपटॉपमध्ये अमेरिकन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र, न्यायालयीन आदेशांची बनावट कागदपत्रे तसेच अमेरिकन पीडित नागरिकांची नावे व डेटा सापडला.
बलवीरने २५ ते ३० कोटी रुपयांची गुंतवणूक करून कॉल सेंटर उभारले. बलवीर-राजवीरचे नातेवाईक मोहाली, अहमदाबाद, मुंबई तसेच परदेशात वास्तव्यास असून, या सिंडीकेटला त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडूनच सहाय्य मिळत असल्याची माहिती फारुकीने चौकशीत उघड केली होती.
या टोळीने अमेरिकन नागरिकांकडून गिफ्ट कार्ड्स, क्रिप्टोकरन्सी (युएसडीटी), वॉलेट्स, पॅक्सफुल, ट्रस्ट वॉलेट, लोकल बिटकॉइन अशा डिजिटल माध्यमांचा वापर केला. हे सर्व क्रॉस बॉर्डर मनी लॉन्डरिंग स्वरूपाचे व्यवहार आहेत. बोगस कॉल सेंटरमधून जप्त करण्यात आलेले लॅपटॉप, मोबाईल हे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज (एफएसएल) येथे तपासणीसाठी देण्यात आले आहेत.
यामध्ये आरोपींनी केलेले कॉल, बँकांचे ट्रॅनजेक्शन्स, डिजिटल डेटा तपासला जात आहे. मात्र, त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे या गुन्ह्यात मुळापर्यंत तपास कसा होणार हे कोडे बनले आहे. पोलिस निरीक्षक गीता बागवडे, एपीआय मोहसीन सय्यद, पीएसआय अमोल म्हस्के, उत्तरेश्वर मुंडे, छाया लांडगे, लालखान पठाण यांचे पथक तपास करत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.