Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

क्रीडा स्पर्धामुळे पोलीस-नागरिकांमधील अंतर कमी करण्यात यशकोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे प्रतिपादनसातारा पोलीस दलाने पटकावले कोल्हापूर परीक्षेत्राचे सर्वसाधारण विजेतेपद

क्रीडा स्पर्धामुळे पोलीस-नागरिकांमधील अंतर कमी करण्यात यश
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे प्रतिपादन
सातारा पोलीस दलाने पटकावले कोल्हापूर परीक्षेत्राचे सर्वसाधारण विजेतेपद

बारामती : खरा पंचनामा

नागरिक आणि पोलीस यातील अंतर कमी करण्यासाठी परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. बारामती येथील या स्पर्धामुळे हा उद्देश सफल झाला असे प्रतिपादन कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी केले. 51 वी कोल्हापूर परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. अपर पोलीस महासंचालक (पोलिस कम्युनिकेशन, आयटी आणि मोटार वाहतूक) दीपक पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत सातारा पोलीस दलाने पुरुष आणि महिला गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

महानिरीक्षक फुलारी म्हणाले, बारामती येथे भव्य पोलीस उप मुख्यालय उभारण्यात आले आहे. येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्यामुळे मुद्दाम बारामतीमध्ये स्पर्धा आयोजित केल्या. राज्याचे विजेतेपद मिळवण्यासाठी परीक्षेत्रातील खेळाडूंनी आतापासून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. प्रमुख पाहुणे अपर पोलीस महासंचालक दीपक पांडे म्हणाले, या स्पर्धाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते. उत्कृष्ट नियोजनामुळे या स्पर्धा व्यवस्थित पार पडल्या. विजेत्यांसहा सर्व खेळाडू, अधिकारी, अंमलदार यांना जो जे वांछिल तो ते लाहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

प्रारंभी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त राज कुमार, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, साताराचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपाधीक्षक दिलीप शिंदे, मधुकर भटे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल : 
१०० मी. पुरूप : प्रथम - चैतन्य मरडे (सातारा), द्वितीय - धनंजय साळुखे (सातारा), तृतीय - साहिल शिंदे (सांगली)
१००. मी महिला :  प्रथम - गौरी सावंत (सातारा), द्वितीय - स्नेहा कोरे (सातारा), तृतीय - हर्षदा जाधव (पुणे ग्रामीण)
कबड्डी पुरूष : प्रथम - पुणे ग्रामीण
क्रॉसकंट्री पुरूष : प्रथम - सातारा
क्रॉसकंट्री महिला : प्रथम - कोल्हापुर
अॅथलेटिक्स पुरूप : प्रथम - सातारा
अॅथलेटिक्स महिला : प्रथम - सातारा
वेस्ट अॅथलिट पुरूष : चैतन्य गाडे (सातारा)
बेस्ट अॅथलिट महिला : गौरी सावंत (सातारा)
जनरल चॅम्पियनशीप पुरूष : सातारा
जनरल चॅम्पियनशीप महिला : सातारा.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.