तीन तास आधी विमानतळावर या. राज्यातील प्रमुख मंदिरांना पोलीस छावणीचे स्वरूप
मुंबई : खरा पंचनामा
दिल्लीतील स्फोटानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट जारी केला असून राज्यातील महत्वाच्या शहरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आली असून पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावत नाकाबंदी सुरू आहे. रात्रीच्या सुमारास वाहनांची कसून चौकशी देखील करण्यात आली. तसेच राज्यातील प्रमुख मंदिरांची सुरक्षाही वाढवण्यात आल्याने मंदिरांना छावणीचे स्वरूप आले आहे. प्रत्येक भाविकाची कसून तपासणी करण्यात येत आहे.
दिल्लीच्या बॉम्बस्फोटानंतर भुसावळ जळगाव रेल्वे स्टेशन हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल यांच्याकडून डॉग स्कॉट शोधक पथक यांच्याकडून प्रवासी वर्गांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच शिर्डीतही पोलिसांची नाकाबंदी आहे. दिल्लीतील भीषण स्फोटानंतर अहिल्यानगर जिल्हा पोलीस अलर्ट मोडवर असून शिर्डी पोलिसांकडून शिर्डी शहरात शिर्डीच्या प्रवेशद्वारासमोर नाकाबंदी सुरू आहे. राज्यभरातून शिर्डीला येणाऱ्या वाहनांची शिर्डी पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. शिर्डीच्या साईदरबारी देश-विदेशातून साईभक्त येत असतात, त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहेत.
काल संध्याकाळी दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणांना विशेष अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात प्रसिद्ध असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातही पोलिसांनी विशेष खबरदारी घेत छावणीचा स्वरूप दिलेला आहे. प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणी करून आत सोडण्यात येत आहे. तर मंदिर परिसरात शीघ्रकृतिदल व पोलिसांचा मोठा पहारा लावण्यात आलेला आहे. या ठिकाणी सशस्त्र पोलीसही नेमण्यात आले आहेत.
मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या अनुषंगाने मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी तात्काळ सर्व सदस्यांसोबत सुरक्षा आढावा संदर्भात पोलिस प्रशासनांसोबत बातचित केली. येणा-या भाविकांची तपासणी कडक सुरू ठेवण्यात आली आहे. मंदिर परीसरात पोलिस सुरक्षा देखील कडक करण्यात आली.
तसेच भारतातील सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. विमान प्रवाश्यांना प्रस्थानाच्या किमान 3 तास आधी विमानतळावर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा कारणाने चेक-इन आणि बोर्डिंगसाठी विमानतळावर तीन तास अगोदर पोहोचण्याचे अपील करण्यात आले आहे. विमानतळावर प्रवेश करण्यासाठी, वैध सरकार मान्यताप्राप्त फोटो ओळखपत्रे बाळगा. चेक-इन बॅगेज व्यतिरिक्त, 7 किलो वजनाची फक्त 1 हँडबॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व प्रवाशांना बोर्डिंगपूर्वी दुय्यम सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असेल अशा सूचना आकासा एयरलाईन्सतर्फे ट्विट करून प्रवाशांना देण्यात आल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.