पोलीस ठाण्यासमोरच अघोरी कृत्याचा प्रकार?
समाजमाध्यमांवर उलट-सुलट चर्चा
उल्हासनगर : खरा पंचनामा
सूड उगवण्याच्या भावनेतून, खजिना शोधण्यासाठी किंवा आयुष्यात यश मिळण्यासाठी अनेकजण अंधश्रद्धेच्या आहारी पडतात. अंधश्रद्धेला बळी पडल्यामुळे अनेक कोवळ्या जीवांचाही काही नराधमांनी बळी घेतल्याची काही उदाहरणं आहेत. अशातच अंधश्रद्धेपासून दूर राहा असे सांगितले जात असताना ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. उल्हासनगर येथे पोलीस ठाण्याजवळच ही घटना घडली आहे. उल्हासनगर क्राइम ब्रँचच्या दारासमोर रविवारी (ता. ९) पहाटे कापलेले लिंबू, हळदी-कुंकू, दूध, भस्म आणि अक्षता ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिसरात जादूटोणा, अंधश्रद्धा कटांच्या चर्चा जोरात रंगल्या. तर आता "ही पूजा कोणाची आणि कोणासाठी?" हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे.
पोलीस ठाण्याच्या समोरच कापलेले लिंबू, हळदी-कुंकू, अक्षता, दूध आणि भस्म ठेवलेले आढळले. पोलीस ठाण्याच्या दाराशीच कोणीतरी रातोरात 'पूजा' करून गेल्याची बातमी पसरताच परिसरात जादूटोणा, कृत्यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, सकाळी पोलीस ठाण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने सर्वप्रथम हे साहित्य पाहिले आणि लगेच वरिष्ठांना माहिती दिली. काही नागरिकांनी याकडे अंधश्रद्धा म्हणून पहिले, तर याला काहींनी 'जादूटोणा' असे स्वरूप देण्यास सुरुवात केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.