सांगलीतील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलिसांचे पायी 'पेट्रोलिंग'
एसपी संदीप घुगे स्वतः उतरले रस्त्यावर
सांगली : खरा पंचनामा
शहरातील ‘डार्क स्पॉट’वरील नशेखोर आणि हुल्लडबाजांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून अधीक्षक घुगे यांच्यासह अधिकाऱ्यांनी शहरातील इंदिरानगर, गोकुळनगर परिसरात रस्त्यावर उतरत पायी पेट्रोलिंग केले.
यामध्ये स्थानिक पोलिसांसह एलसीबी, विशेष शाखा, राखीव दल, जलद कृती दलाचा यात समावेश होता. सांगली शहरात घरात घुसून उत्तम मोहिते याचा खून करण्यात आला. त्यानंतर काल कुपवाड परिसरात सराईत गुन्हेगाराने गोळीबार केल्याची घटना घडली. तसेच फाळकूटदादांसह सराईत गुन्हेगारांचा शहरात सर्रास वावर सुरू आहे. सांगली आणि मिरज उपाधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील आठ पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा माहिती संकलित केली. त्यानंतर आजपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
सांगली-मिरजेत आता पुढील काही दिवस ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यात प्रामुख्याने गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणी, ओपन बार, नशेखोरांचे ‘डार्क स्पॉट’ हेरले जाणार आहेत. त्याठिकाणी पोलिसांची एकवेळेस फेरी नसून ठिय्या मारला जाणार आहे. त्याठिकाणी असा कोणी दिसून आल्यास त्यावर पोलिसांचा दंडुका उगारला जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.