Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गँगस्टर अनमोल बिश्नोईला दिल्ली विमानतळावर अटक, NIA ने घेतला ताबा

गँगस्टर अनमोल बिश्नोईला दिल्ली विमानतळावर अटक, NIA ने घेतला ताबा

दिल्ली : खरा पंचनामा

सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी अनमोल बिश्नोई यांचे भारतात प्रत्यार्पण होणार आहे. आज (बुधवार १९ नोव्हेंबर) अमेरिकेतून त्याचे भारतात प्रत्यार्पण होत आहे. त्याला दिल्ली विमानताळावर आणताच NIA ने त्याला ताब्यात घेतले आहे. अमनोमल बिश्नोईसोबत अमेरिकेने हद्दपार केलेल काही इतर लोकही आहेत.

कायदेशीर प्रक्रियेनुसा, अनमोल बिश्नोई दिल्ली विमानतळावर पोहोचताच त्याला राष्ट्रीय तपासच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला पटियाला हाउस कोर्टात हजर केले जाणार आहे. यानंतर न्याालयाच्या आदेशानुसार त्याला कोठडी, चौकशी आणि पुढील प्रक्रियेसाठी नेले जाईल.

अनमोलवर अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये सामील असल्याचे आरोप आहेत. त्याच्या बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर गोळीबार करण्याचा, तसेच सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दीकीच्या हत्याकांडाचा देखील आरोप आहे. याशिवाय इतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

अनमोलला भारतात आणल्यानंतर कोणत्या कस्टडीमध्ये ठेवायचे याचा निर्णय केंद्र सरकारद्वारे घेतला जाणार आहे. महाराष्ट्रा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकणाअंतर्गत मुंबई पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी अर्ज करणार आहेत. त्याच्यावर देशाच्या अनेक राज्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अनमोल फेब्रुवारी २०२५ मध्ये अमेरिकेने ताब्यात घेतले होते. तो अमेरिकेतून भारतात गुन्हेगारीच्या कारवाया करत होता. अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने त्याला बेकयादेशीरपणे अमेरिकेत राहण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर १८ नोव्हेंबर रोजी त्याला हद्दपार करण्यात आले. याची माहिती बाबा सिद्दीकी पुत्र झीशान सिद्दीकी याने दिली. यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने तातडीने त्याच्या भारतात प्रत्यार्पणाची तयारी सुरु केली.

भारत तपास संस्थान NIA च्या आणि मुंबई पोलिसांच्या मोस्ट वान्टेड यादीत अनमोल बिश्नोईचे नाव सामील आहे. NIA ने त्याच्यावर १० लाखांचे बक्षीसही ठेवले होते. अनमोल हा लॉरेन्स बिश्नोईचा सखा भाऊ आहे. बिश्वोई गँगचा अनेक आपरेशन्स नियोजन व व ते पूर्ण करणे अनमोल करत होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.