Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

थायलंडचा हायड्रो गांजा विकायचा, भाजप नेत्याच्या मुलाला अटक

थायलंडचा हायड्रो गांजा विकायचा, भाजप नेत्याच्या मुलाला अटक

नवी मुंबई : खरा पंचनामा

थायलंडमधून तस्करी करून आणलेला हायड्रो गांजा विकल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईत भाजप नेत्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने भाजपच्या भारत रक्षा मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा बीना गोगरी यांचा मुलगा केयूर जयेश गोगरी (२९) याला अटक केली आहे. खारघर सेक्टर १९ मधील घरात पोलिसांनी छापा टाकला. गोगरीच्या घरातून पोलिसांनी ५,००० रुपयांचा ८०० मिलीग्राम हायड्रो गांजा जप्त केला. त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

गोगरी हा थायलंडमधून आलेल्या हायड्रो गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना एका गुप्त सूत्राने दिली. या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने गोगरी यांच्या खारघरमधील शिवसाई इमारतीत छापा टाकला. पोलिसांना गोगरीच्या अपार्टमेंटमधून प्लास्टिकची पाकिटे, एक क्रशर आणि वजनकाटा जप्त करण्यात आला. पोलिसांनी गोगरी याच्या गाडीचाही तपास केला. त्याच्या गाडीमधून पोलिसांनी हायड्रो गांजा आढळला.

गोगरीच्या मित्रांनी थायलंडमधून बेकायदेशीर मार्गांनी तस्करी केल्याचा संशय असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अटकेत असलेल्या गोगरीने चौकशीत अनेक गोष्टी कबूल केल्या. भांडूप येथील मित्र शारिखकडून गांजा मिळवल्याचे त्यांने गोगरीने कबूल केले. हा गांजाची थायलंडमधून तस्करी करण्यात आल्याचेही त्याने पोलिसांच्या चौकशीत सांगितले. त्याशिवाय उलवेमधील नोमान या मित्राकडूनही त्याने गांजा घेतल्याचे कबूल केले. खारघरमध्ये हा गांचा विकण्याचा प्लान होता, असेही त्याने पोलिसांच्या तपासात कबूल केले.

केयूर जयेश गोगरी याच्यावर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गोगरीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी थायलंडस्थित ड्रग्ज नेटवर्कशी संबंध असणाऱ्या दोघांचा शोध सुरू केला आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्स आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.