माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या नातवावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल
नाशिक : खरा पंचनामा
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटील आणि त्याच्यासह आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा कंपनीतील शेअर भागीदारी आणि आर्थिक व्यवहारातील फसवणुकीसंदर्भात दाखल झाला असून तक्रारदार हे भाजपचेच पदाधिकारी आहेत. उद्योजक कैलास आहेर, असे तक्रारदाराचे नाव आहे.
तक्रारदार कैलास आहेर यांनी आपल्या कंपनीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यावरून शिवम पाटील आणि इतर काही जणांना भागीदारी दिल्याचा आरोप केला आहे. आहेर यांच्या मते, त्यांनी 14 टक्के कंपनीचे शेअर्स दानवे यांच्या सूचनेनुसार शिवम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले. या शेअर्सच्या बदल्यात 25 कोटी रुपयांचा व्यवहार ठरला होता.
मात्र, त्यापैकी 10 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं त्यांनी पोलिसांत नमूद केलं आहे.
उद्योजक केलास आहेर म्हणाले की, मी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. माजी खासदार रावसाहेब दानवे यांचे साथीदार गिरीश नारायण पवार आणि टीमने माझी 2018 साली फसवणूक केली. मुंबईला मला रावसाहेब दानवे भेटले होते. त्यांनी मला सांगितले होते की, मी मंत्री आहे. तुला सरकारी कामे आणून देईल. तुझ्या कंपनीचा टर्नओव्हर मी दोन-पाचशे कोटी रुपयांपर्यंत वाढवून देईल. माझ्या नातवाला तू पार्टनर बनवून घे. त्यावेळी मी विचार केला की, इतका मोठा माणूस सांगत आहे. यामुळे माझ्या कंपनीत अजून लोकांना रोजगार मिळेल. मी त्यांच्यावर भरोसा ठेवला. त्याप्रमाणे मी त्यांना होकार दिला.
त्यांनी माझ्या फॅक्टरीत भेट दिली. त्यानंतर मला माझ्या शेअर्सची किंमत विचारण्यात आली. त्यावेळी मी 14 टक्के शेअर्स मी 25 कोटी रुपयांना द्यायचे ठरवले. त्याप्रमाणे रावसाहेब दानवेंनी 50-50 लाखांचे दोन चेक मला द्यायला सांगितले. त्यावेळी मी त्यांना विचारलं की, बाकीचे पैसे कधी देणार? तेव्हा मला दानवे म्हणाले की, तुला काय करायचे आहे. मी बघून घेईन. पण इतका मोठा माणूस मला सांगत असल्याने मी त्यावेळी हो म्हटलो होतो. मात्र नंतर माझी फसवणूक झाली, असे त्यांनी म्हटले. या प्रकरणी रावसाहेब दानवे यांचे नातू शिवम पाटीलसह आठ जणांवर नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.