Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संदीप भागवत यांनी घेतला सांगलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार

संदीप भागवत यांनी घेतला सांगलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार

सांगली : खरा पंचनामा

मुंबईचे तत्कालीन एसीपी संदीप भागवत यांनी शनिवारी सांगलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारीनी त्यांचे स्वागत केले.

श्री. भागवत यांनी यापूर्वी कोल्हापूर, सातारा व सांगली सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कामकाज पाहीले. सांगलीत असताना त्यांची मुंबई येथे पदोन्नतीवर एसीपी पदावर बदली झाली होती. मुंबई येथून कार्यमुक्त होवून शनिवारी त्यांनी सांगलीचा पदभार स्वीकारला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.