'राज्यात लाखो दुबार मतदार, तिथेच फोडून काढा'
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईत महाविकास आघाडीकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे, यावेळी, 'राज्यात लाखो दुबार मतदार, मतदार याद्यांचा मोठा घोळ आहे, आरोप निवडणूक आयोगावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
उन्हातान्हात मतदान करणाऱ्या मतदाराचा हा अवमान आहे, असं राज ठाकरे म्हणाले. प्रत्येक घराघरात जा, असं आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. तसंच, दुबार तिबार वाले तिथे आले तर तिथंच त्यांना फोडून काढा, असं राज ठाकरे म्हणाले.
कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पालघर इथल्या साडेचार हजार मतदारांनी मलबार हिलमध्येही दुबार मतदान केलं, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. माझ्याकडे साडेचार हजार नावे आहेत. त्यांनी त्या मतदार संघात मतदान केले आहे आणि मलबार हिल या ठिकाणीही मतदान केलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात 17 लाख 29 हजार मतदारांपैकी 62370 मतदार दुबार आहेत. दक्षिण मुंबईत 1515993 मतदारांपैकी 55000 मतदार दुबार आहेत.
मावळमध्ये 145636 दुबार मतदार,
पुणे 102000 हजार दुबार मतदार,
ठाणे 209000 दुबार मतदार आहेत.
राज ठाकरे यांनी अशी यादी सांगतात त्याच्याकडे असलेल्या संपूर्ण पूराव्यांचा ठिगच दाखवला. एवढे मतदार दुबार असताना जानेवारी महिन्यात निवडणूक कशाला घेता? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
संविधानाने जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे, तो आता जपायची वेळ आली आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी असे मोर्चे निघाले होते. काळा घोडा परिसरातील मोर्चे विशेष होते. त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जबरदस्त एकजूट दाखवली, असं शरद पवार म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.