"झालं गेलं गंगेला मिळालं, माझंही साहेबांवर प्रेम"
बारामती : खरा पंचनामा
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांना यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "प्रस्वाव आला असल्याचा आणि त्यावर दोन दिवसांत निर्णय घेणार आहे" असे म्हणत दुजोरा दिला होता.
आता "झालं गेलं गंगेला मिळालं... माझंही साहेबांवर प्रेम" असं म्हणत हा निर्णय सकारात्मक असणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. बारामतीत गुरुवारी (ता. 13) बारामती नगरपरिषद व माळेगाव नगरपंचायतीच्या उमेदवारांच्या मुलाखतीनंतर झालेल्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
मेळाव्यात बोलताना अजित पवार यांना एका कार्यकर्त्याने चिठ्ठी आणून दिली. यात लोकसभा निवडणुकीबाबत काही नमूद केले होते. या चिठ्ठीवर व्यक्त होताना अजित पवार यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला. खासदारकीला अस झालं, आमदारकीला असं झालं, असलं काही तुम्ही मला सांगू नका. शेवटी सगळे मतदार आपलेच आहेत, असे म्हणत आगामी वाटचाल दिशा स्पष्ट केली.
अजित पवार पुढे म्हणाले, काय झालं, एका बाजूला आदरणीय पवारसाहेब आणि एका बाजूला अजित पवार. बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण होणारच ना? का काहींचं प्रेम साहेबांवर नसावं ? असलं पाहिजे, माझंही प्रेम आहेच ना. पण मी काही राजकीय भूमिका घेतली, याचा अर्थ काहीतरी वेगळा छोटा विचार करणे चुकीचे आहे.
अरे जरा दिलदारपणा वाढवा. मनाचा मोठेपणा करा. आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना? मला सुरवातीला निवडून द्यायला पवारसाहेबच कारणीभूत आहेत ना? मी काय वरुन पडलो होतो का? हे कसं आपल्याला विसरता येईल. तुम्ही फार संकुचित विचारांचे राहू नका. बारामतीकरांनी विधानसभेला मला लाखांचं मताधिक्य दिलचं ना? असं सांगत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनाही बेरजेचे राजकारण करण्याचा संदेश या निमित्ताने दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.