खून प्रकरणातील संशयितावर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी चौघांना अटक
मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मिरजेत झालेल्या निखील कलगुटगी याच्या खुनातील मुख्य सूत्रधार सलीम पठाण याच्यावर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बुधवारी शहर पोलिसांनी अटक केली. तर त्याच्या अन्य चार साथीदारांना गुरुवारी महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे.
समर्थ संजय गायकवाड (वय २१, रा. १०० फुटी रोड हाडको कॉलनी), आकाश जगन्नाथ फोंडे (वय २१, रा. म्हाडा कॉलनी आंबेडकर नगर), वैभव राजाराम आवळे (वय २८, रा. १०० फुटी रोड हाडको कॉलनी), सौरभ प्रसाद पोतदार (वय २३, रा. म्हाडा कॉलनी आंबेडकर नगर, सर्व रा. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर बुधवारी वंश बाली याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन काडतूस, कोयता जप्त करण्यात आला आहे.
मिरजेत पूर्व वैमनस्य आणि गोळीबाराच्या कारणातून निखील कलगुटगी याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुख्य सूत्रधार असणारा सलीम पठाण याच्यासह 13 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान सलीम पठाण याला बुधवारी मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. यावेळी त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वंश बाली याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याचे अन्य साथीदार पळून गेले होते. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने चार साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर चौघांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असताना पाठलाग करून पकडले.
मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, एलसिबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, महात्मा गांधी चौकचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शानाखाली उपनिरीक्षक संदिप गुरव, अभिजीत पाटील, अभिजीत धनगर, सर्जेराव पवार, नाना चंदनशिवे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, मोहसीन टीनमेकर, साईनाथ पुजरवाड, राजेंद्र हारगे, एलसीबीचे उपनिरीक्षक महादेव पवार, अमोल ऐदाळे, इम्रान मुल्ला, रोहन घस्ते, अनंत कुडाळकर यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.