Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आर्थिक गैरव्यवहारचा गुन्हा रद्द कराबडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची विशेष न्यायालयात मागणी

आर्थिक गैरव्यवहारचा गुन्हा रद्द करा
बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची विशेष न्यायालयात मागणी

मुंबई : खरा पंचनामा

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. कथित कृतींमागील हेतू केवळ सह-आरोपी आणि राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशांचे पालन करणे हा असल्याचा दावाही वाझे यांनी तुरुंगातून केलेल्या अर्जात केला आहे.

आपल्याविरोधात सक्तवसूली संचालनायलाने (ईडी) केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत, त्यामुळे आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करावा, असे वाझे यांनी अर्जात म्हटले आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १९७ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या तरतुदींनुसार सरकारकडून अनिवार्य मंजुरी घेण्यात आलेली नाही, असेही वाझे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी आपल्याला लक्ष्य केले गेले आहे. तथापि, कथित गुन्ह्यामागील हेतू केवळ तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशांचे पालन करणे हा होता. या गुन्ह्यातून मिळालेल्या रकमेच्या पुढील वापराची किंवा त्याच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारातील देशमुख यांच्या सहभागाची आपल्याला कोणतीही माहिती नव्हती. असा दावा देखील वाझे यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना केला आहे. दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी वाझे यांच्या अर्जाची दखल घेऊन ईडीला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

ईडीच्या आरोपांनुसार, वाझे यांच्यामार्फत देशमुख यांनी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्स मालकांकडून ४.७० कोटी रुपये गोळा केले आणि हे पैसे नागपूर येथील श्री साई शिक्षण संस्थानकडे वळवले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.