Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"एकनाथ खडसे-गिरीश महाजन यांच्या वादात माझे सँडविच."

"एकनाथ खडसे-गिरीश महाजन यांच्या वादात माझे सँडविच."

जळगाव : खरा पंचनामा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणधुमाळीत कट्टर विरोधक एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दोघांमध्ये सुरू असलेल्या राजकीय वादावर प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही नेत्यांमधील वादात आपले सँडविच झाल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सध्याच्या घडीला एकनाथ खडसे यांना कोणीही ओळखत नसल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.

निवडणुकांच्या तयारीच्या संदर्भात बोलताना गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, कोण ओळखतो त्या खडसेला? ते सध्या कोणत्या पक्षात आहेत, हेच लोकांना कळत नाही. त्यांचे अस्तित्व आज राजकारणात कुठेही दिसत नाही. एकनाथ खडसेंचे राजकारणात आता काही शिल्लक राहिलेले नाही. निकाल लागल्यानंतर ठाकरे गटाची ताकद किती, काँग्रेसची किती आणि शरद पवार गटाची ताकद किती हे कळेल, असे ते म्हणाले.

एकनाथ खडसेंनी जिल्ह्यातील एखादी तरी नगर परिषद निवडून दाखवावी, असेही आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे सुद्धा कळत नाही. त्यांच्याविषयी बोलण्यासारखे आता फार काहीही राहिले नाही. खडसेंनी लोकसभा निवडणुकीत आपल्या सुनेला मदत केली होती. आता ते प्रत्येक निवडणुकीत स्वतःची भूमिका बदलत असतात. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि घरातल्या घरात राजकारण करायचे, असे त्यांचे सध्या चालले आहे.

भोसरी जमीन खरेदी व्यवहारावरून आरोप झाल्यावर खडसेंनी स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता. तर त्यांना तो द्यायला सांगितला होता, असाही टोला महाजन यांनी हाणला आहे. त्या विषयी बोलताना एकनाथ खडसे यांनीही आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा गिरीश महाजन खूप लहान होते.

भाजपकडून मला राजीनामा देण्याविषयी सूचना मिळताच मी त्यावेळी अर्ध्या तासांच्या आत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मला कोणी राजीनामा देण्यास भाग पाडले नव्हते. तसे नसते तर मला मंत्रिमंडळातून काढून टाकले असते. मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. वैयक्तिक मंत्री महाजन यांच्यावर बऱ्याच वेळा आरोप झाले पण त्यांनी कधीच राजीनामा दिला नाही, अशी टीका केली.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी चोपड्यातील प्रचार सभेनंतर बोलताना खडसे आणि महाजन या दोन ज्येष्ठ नेत्यांमधील वादामुळे स्वतःची झालेली कोंडी स्पष्ट शब्दांत मांडली. एकनाथ खडसे हे माझे सासरे आहेत आणि त्यांच्याबद्दल मनापासून आदर आहे. तर गिरीश महाजन हे पक्षातील ज्येष्ठ नेते असून ते माझ्या वडिलांसारखेच आहेत. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद झाल्यावर मी मध्येच अडकत असते. एकीकडे नाथाभाऊ सासरे आणि दुसरीकडे गिरीश काका वडिलांसारखे, त्यामुळे त्यांच्या वादामुळे माझं अक्षरशः सँडविच होते, असे त्या म्हणाल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.