Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मधरात्री अचानक मतमोजणी केंद्रात ट्रक घुसल्याने गोंधळ

मधरात्री अचानक मतमोजणी केंद्रात ट्रक घुसल्याने गोंधळ

नवी दिल्ली : खरा पंचनामा

बिहार विधासभेसाठी पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठी 6 नोव्हेंबर रोजी 64.66 टक्के मतदान झाले, तर दुसऱ्या टप्प्यातील 122 जागांसाठी 11 नोव्हेंबर रोजी 67.64 टक्के मतदान झाले आहे.

विशेष म्हणजे यंदा मतदानाचे प्रमाण वाढल्यामुळे 14 नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्याआधीच रोहतास जिल्हा मुख्यालय येथे असलेल्या सासाराममधील मतमोजणी केंद्रात बुधवारी (12 नोव्हेंबर) मध्यरात्री अचानक एक ट्रक स्ट्रॉग रूमच्या आवारात घुसल्याने खळबळ उडाली आहे. ट्रकला मतमोजणी आवारात घुसताना पाहून स्ट्राँग रुमच्या आवारात उपस्थित असलेल्या अनेक उमेदवारांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. तसेच स्ट्राँग रूममधील सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याप्रकरणी जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी तपास सुरू केला आहे.

सासाराम स्ट्राँग रूममध्ये ट्रक घुसल्याने झालेल्या गोंधळाची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी उदिता सिंह आणि पोलीस अधीक्षक रोशन कुमार यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी ट्रकची तपासणी केली, परंतु त्यांना ट्रकमध्ये रिकामे बॉक्स आढळून आले. त्यामुळे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले की, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे आणि जर काही अनियमितता आढळली तर कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान, पोलिसांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली होती. परंतु पोलीस अधीक्षक रोशन कुमार यांनी लाठीचार्जच्या आरोपांचे पूर्णपणे खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे.

स्ट्राँग रूमच्या आवारात ट्रक घुसल्यानंतर स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम बदलले जात असल्याची अफवा पसरली. या अफवेनंतर सातही विधानसभा मतदारसंघातील अनेक उमेदवार रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. अनेक उमेदवार त्यांच्या समर्थकांसह रात्रभर मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित होते आणि त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने जनतेला अफवांवर लक्ष देऊ नका, असे आवाहन केले आहे. स्ट्राँग रूम पूर्णपणे सुरक्षित आणि देखरेखीखाली आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.