डॉ. तेजस्वी गपाट यांचे सनदी लेखापाल परीक्षेत यश
बार्शी : खरा पंचनामा
येथील डॉ तेजस्वी विजय गपाट या सनदी लेखापाल (चार्टर्ड अकौटंट) ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
तेजस्वी यांनी अगोदर मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डेंटल सर्जरीतील पदवी घेतली होती. सनदी लेखापाल विजय गपाट यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी सनदी लेखापाल होण्याची जिद्द बाळगत तयारी केली. कुटुंबियांची साथ व अथक परिश्रमातून त्यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. विजय गपाट यांचे बंधू गणेश गपाट हेही सनदी लेखापाल आहेत. एका सामान्य शेतकरी कुटुंबातुन प्रगती साधलेल्या नवनाथ गपाट यांच्या कुटुंबातील तिघे सनदी लेखापाल झाले आहेत. डॉ तेजस्वी गपाट या बार्शीतील डॉ गणेशकुमार सातपुते यांच्या भगिनी आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.