Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आता सिम कार्डशिवाय WhatsApp, Telegram सारखे अँप्स वापरता येणार नाही

आता सिम कार्डशिवाय WhatsApp, Telegram सारखे अँप्स वापरता येणार नाही

मुंबई : खरा पंचनामा

व्हॉट्सअॅप, टेलिग्राम किंवा स्नॅपचॅट सारखे अॅप्स वापरणाऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठे अपडेट आले आहे. सरकारने देशातील अनेक लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सच्या वापराच्या पद्धतीत महत्त्वाचे बदल करून नवीन नियम लागू केले आहेत. यापूर्वी कोणत्याही स्मार्टफोनमध्ये सिम कार्ड नसतानाही व्हॉट्सअॅप किंवा इतर मेसेजिंग अॅप्स वापरणे शक्य होते, पण आता तसे होणार नाही. तुमच्या फोनमध्ये अॅप इन्स्टॉल होईल, परंतु लॉगिन आणि वापरासाठी, डिव्हाइसमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर असलेले सिम कार्ड जोडलेले असणे आवश्यक असणार आहे.

दूरसंचार विभागाने हे बदल करण्यामागे सायबर गुन्हेगारांकडून होणारा अॅप्सचा गैरवापर रोखणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. आता 'सिम बाइंडिंग' मुळे वापरकर्त्याच्या नंबर, फोन आणि अॅपमध्ये एक मजबूत लिंक तयार होईल. यामुळे स्पॅम, फ्रॉड कॉल्स आणि आर्थिक फसवणूक यावर नियंत्रण मिळवता येईल. सायबर गुन्हेगार सिम निष्क्रिय झाल्यानंतरही अॅपच्या माध्यमातून फसवणूक करत होते, कारण अॅपचा लॉगिन एकदा झाल्यावर तो सिमवर अवलंबून न राहता काम करत असे. तसेच, व्हॉट्सअॅप वेब आणि तत्सम वेब वर्जनवर आता दर सहा तासांनी आपोआप लॉगआउट होईल आणि पुन्हा क्यूआर कोडने लॉगिन करावे लागेल.

हा नवीन नियम दूरसंचार सुरक्षा आणि जबाबदारी वाढवण्यासाठी उचललेला एक महत्त्वाचा पाऊल आहे, जो सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

हा नवा नियम दूरसंचार सायबर सुरक्षा (सुधारणा) नियम, २०२५ अंतर्गत लागू करण्यात आला आहे. यामुळे प्रथमच अॅप-आधारित दूरसंचार सेवांनाही कडक दूरसंचार नियमांच्या कक्षेत आणले गेले आहे. कंपन्यांना ९० दिवसांच्या आत या नियमाची अंमलबजावणी करावी लागणार आहे. या नियमामुळे लॉगऑफ होण्याची तात्पुरती गैरसोय होऊ शकते, परंतु दीर्घकाळात यामुळे सुरक्षितता वाढून फसवणूक कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.