भाजप महिला उमेदवाराकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान!
गळ्यात भाजपचा दुपट्टा अन् जिरेटोपवर पक्षाची टोपी
भंडारा : खरा पंचनामा
महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कामयच भावनिक मुद्दा राहिल्याचे अनेकदा दिसून आले आहे. महाराजांचे नाव घेत अनेकजण राजकारण करताना दिसाताहेत. पण, आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा भाजपच्या एका महिला उमेदवाराने अवमान केल्याची घटना आहे.
महाराजांच्या जिरेटोपवर टोपी आणि गळ्यात भाजपचा पट्टा परिधान केला आहे, हे बघून आता विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेत संताप व्यक्त केला. ही संतापजनक घटना भंडाऱ्यात घडली आहे. या घटनेवरून आता सोशल मिडिया युझर्सने भाजपला चांगलंच सुनावलंय.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर आहे. याचपार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्या प्रभाग क्रमांकात प्रचार करताना दिसताहेत. पण हे सर्व सुरु असताना भंडाऱ्यातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये एका महिला भाजप उमेदवाराने प्रचारादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याची घटना समोर आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना त्या महिला उमेदवाराने महाराजांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा घातला आणि जिरेटोपवर भाजपची टोपी परिधान केली. असं लज्जास्पद कृत्य करताना उमेदवारांच्या बुद्धीची किव येऊ लागली आहे. या कृत्याने शिवभक्तांच्या भावनांना तडा गेली आहे. याचपार्श्वभूमीवर समाजमाध्यमांवरील काही नेटकऱ्यांनी आपल्या भावना दुखावल्याचं सांगितलं आहे.
भाजपच्या अशा कृतीवर काँग्रेसने सडकून टीकेचे अस्त्र डागले आहे. भाजप वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतं. पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिवाजी महाराज यांचे जिरेटोप परिधान केले होते, त्यावरूनच ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा सतत अवमान करत असल्याची टीका काँग्रेसनं केली होती. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांची हिंमत वाढली असून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची त्याच्या प्रवृत्तीत वाढ होताना दिसते, असे टीकेचे अस्त्र काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी डागलेत.
या कृत्याने अचारसंहितेचा भंग झाल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे कुठेतरी राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते, यांनी देखील तीव्र विरोध दर्शवला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.