जयसिंगपूर येथील प्रभाग 11 मधून रंगराव पवार विजयी
माजी नगरसेवक सर्जेराव पवार यांचा वारसा अबाधित
जयसिंगपूर : खरा पंचनामा
येथील प्रभाग 11 मधून शिरोळ तालुका विकास आघाडीचे उमेदवार रंगराव हिंदुराव पवार विजयी झाले. त्यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवाराचा 369 मतांनी पराभव केला. रंगराव पवार यांच्या विजयाने त्यांचे बंधू माजी नगरसेवक सर्जेराव पवार यांचा राजकारण आणि समाजकारणाचा वारसा अबाधित राहिला आहे.
जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक दि. 2 डिसेंबर रोजी मोठया चूरशीने पार पडली. निकाल लांबल्याने कार्यकर्ते नाराज झाले होते. अखेर आज रविवारी मतमोजणी पार पडली. प्रभाग 11 मधील उमेदवार रंगराव पवार यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. तिसऱ्या फेरीअखेर आघाडी कायम राहिल्यानंतर पवार यांच्या कार्यकर्ते, समर्थकांनी एकच जल्लोष केला.
निकाल जाहीर झाल्यानंतर पवार यांच्या समर्थकांनी त्यांची उघड्या जीपधून मिरवणूक काढली. यावेळी नूतन नगरसेवक रंगराव पवार यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आभार मानले.
दुपारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याहस्ते त्यांनी प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी माजी नगरसेवक सर्जेराव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शंकर नाळे यांच्यासह समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.