मामा-भाच्याने गड राखला ! संगमनेरमध्ये डॉ. मैथिली तांबे यांचा विजय
संगमनेर : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडल्याने संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत तब्बल 40 ते 45 वर्षांनी प्रथमच प्रचंड चुरस पाहायला मिळाली. विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी दोन प्रभावी राजकीय घराण्यांमध्ये थेट लढत झाल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
तांबे-थोरात विरुद्ध खताळ-विखे असा सामना रंगतदार ठरला. नगरपालिकेच्या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीने सुरुवातीपासूनच आघाडी घेत विजयावर आपली मोहोर उमटवली. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून समितीचे उमेदवार आघाडीवर राहिले, तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे यांनी विजय मिळवला आहे.
तांबे घराण्याकडून पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांना 'संगमनेर सेवा समिती' पॅनलकडून उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ या शिवसेना (शिंदे गट) महायुतीकडून मैदानात उतरल्या. दोन्ही बाजूंनी प्रभावी राजकीय कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संघर्ष अधिक तीव्र झाला.
संपूर्ण प्रचारकाळात संगमनेरमध्ये राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा रंगल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांची प्रचारसभा जितकी गाजली, तितकीच दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या सभा जोशात पार पडल्या. स्थानिक पातळीपासून ते राज्याच्या नेतृत्वापर्यंत सर्वांचे लक्ष वाघ-सिंहच्या लढाईत कोण बाजी मारणार? याकडे होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.