राज्यातील 22 नगराध्यक्षांच्या निवडणुका अचानक पुढे ढकलल्या !!
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने वेगवेगळी कायदेशीर कारणे देऊन महाराष्ट्रातल्या 22 नगराध्यक्षांच्या हाय प्रोफाईल निवडणुका अचानक पुढे ढकलल्या. या निवडणुकांचा नवीन कार्यक्रम आणि प्रक्रिया सुद्धा जाहीर केली त्यानुसार 20 डिसेंबरला मतदान होऊन 21 डिसेंबरला निकाल जाहीर होईल.
पण निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केलेल्या निवडणुकांचा प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी अचानक निवडणूक रद्द करायचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली पण विरोधकांनी मात्र साधा आवाजही काढला नाही.
निवडणूक आयोगाने आरक्षण मर्यादा ओलांडल्याचे कारण देऊन बारामती, अनगर, कोपरगाव, पाथर्डी, महाबळेश्वर, फलटण, नेवासा, मंगळवेढा, फुरसुंगी, फुलंब्री धर्माबाद वसमत रेणापूर, अंबरनाथ, यवतमाळ, बाळापूर, अंजनगाव सुर्जी आणि देऊळगाव राजा या गावांमधल्या नगराध्यक्ष पदांच्या निवडणुका आणि काही नगरसेवकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. हे सगळे मतदारसंघ आणि गावे महाराष्ट्रातल्या हाय प्रोफाईल नेत्यांचे बालेकिल्ले मानले जातात. आपापले गड राखण्यासाठी आणि गडाला खिंडार पाडण्यासाठी इथे सगळे मेहनत घेतात. पण याच बालेकिल्ल्यांच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक पुढे ढकलल्यानंतर विरोधी पक्षांपैकी कुणीही निवडणूक आयोगावर आवाज टाकला नाही.
अनगरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजन पाटलांनी जंग जंग पछाडले. विरोधातले सगळे आवाज दाबले पण त्यांच्या या "मेहनतीवर" सगळे पाणी फेरले. अनगरच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक रद्द झाली. त्यामुळे राजन पाटलांची सून अनगरची पहिली नगराध्यक्षा होऊ शकली नाही.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांची मेहनत वाया गेली. खर्च वाया गेला. निवडणुका आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावून या निवडणुका अचानक पुढे ढकलल्या. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगासमोर प्रेझेंटेशन करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.