वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शरीर सुखाची मागणी, 2 वर्ष छळ; नर्सचा आत्महत्येचा प्रयत्न
गडचिरोली : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेत खळबळ उडवणारी घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यात तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने शरीर सुखाची मागणी करत परिचारिकेचा दोन वर्षांपासून छळ केला. या छळाला कंटाळून परिचारिकेने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तपादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गडचिरोली म्हणजे अतिदुर्गम नक्षली संवेदनशील जिल्हा. या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची आणि व्यवस्थेची स्थिती सतत चर्चेत असते. मात्र, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी कशा पद्धतीने वेगवेगळ्या दबावात असतात याची चुणूक एका नव्या प्रकरणात मिळाली. एका तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने अधिनस्थ परिचारिकेचा शरीर सुखाच्या मागणीसाठी गेली दोन वर्षे छळ चालविला. तिची वेतन वाढ रोखून तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वांसमक्ष अपमानित करण्याचे प्रकार घडले.
हे प्रकार सातत्याने घडत असताना तिने या प्रकरणाची तक्रार मात्र कुठेही केली नाही. शेवटी असह्य झाल्यानंतर परिचारिकेने घरीच विष प्रशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील वैद्यकीय अधिकारी याआधीही विविध कारणांसाठी वादग्रस्त ठरल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद या तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मालेगाव पाठोपाठ आता मनमाड शहरात ही अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी 64 वर्षीय बाबा भागवतला अटक केली. आरोपीवर ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.